Diwali zendu Fule.jpeg
Diwali zendu Fule.jpeg 
सोलापूर

चैतन्यदायी दीपोत्सवास आनंदात प्रारंभ 

अरविंद मोटे

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गुढीपाडव्यापासून विजयदशीपर्यंतचे सर्वच सण साधेपणाने व अनेक बंधनात साजरे झाले. सणांचा राजा दिवाळीच्यावेळी मात्र ही बंधने शिथिल झाल्याने दिवाळीच्या सणाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. 

मागील सहा महिन्यांपासून कोरोनामुळे निर्माण झालेले बाजारपेठेवरील मंदीचे सावट दिवाळीच्या सणामुळे हटले आहे. गुरुवारी वसुबारसेने दिपोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. आज धनत्रोयादशीनिमित्त शहरातील सोन्या-चांदीच्या बाजारपेठा सजल्या होत्या. आज सोन्याला प्रति दहा ग्रॅम 48 हजार 830 रुपये इतका दर होता. धनत्रयोदशीच्या निमित्ताने अनेकांनी आनंदाने सोने खरेदी केली. 

शनिवारी (ता.14) नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आहे. लक्ष्मीपूजनास झेंडूच्या फुलांचे विशेष महत्त्व असल्याने बाजारात झेंडूची फुले मोठ्या प्रामणात दाखल झाली आहेत. विजयादशमीच्या तुलनेत झेंडूच्या फुलांचे दर वाढले होते. आज 140 ते 180 रुपये प्रति किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री सुरू होती. 

सोमवारी (ता.16) बलिप्रतिपदा व भाऊबीज हेही एकाच दिवशी आहेत. दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई याबरोबरच फटक्‍यांच्या अतिषबाजीने हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फटकेमुक्त दिवाळी करण्याचे आवाहन अनेक सामाजिक संस्थाकडून प्रशासनाकडून करण्यात आले असले तरी फटक्‍याचे स्टॉल मोठ्या प्रमाणात सजले आहेत. फटक्‍याच्या विक्रीही धुमधडाक्‍यात सुरू आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT