Maratha Reservation sakal
सोलापूर

Maratha Reservation : मराठा आंदोलनाची आठवड्यात पुढची दिशा ; आरक्षण लढाई

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण केल्यानंतर राज्यातील मराठा बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाला होता. नुकतेच सोलापूरसह राज्यात ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण केल्यानंतर राज्यातील मराठा बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाला होता. नुकतेच सोलापूरसह राज्यात ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, परीक्षांचा काळ व विधानसभेच्या अधिवेशनात नक्की काय होतेय? यामुळे मराठा आंदोलक सध्या शांत झाले आहेत. मराठा आंदोलनाची दिशा या आठवड्यात ठरण्याची शक्यता आहे.

मराठा समाजात कुणबी नोंद सापडल्यानंतर सग्या-सोयऱ्यांनाही जात प्रमाणपत्र द्यावे, या संदर्भात काढलेल्या अधिसूचनेचे रूपांतर कायद्यात करावे यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी जरांगे-पाटील यांनी उपोषणाला सुरवात केली होती. जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची सरकारने तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी यासाठी सोलापू्र शहरासह जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला होता. जिल्ह्यात काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी रास्तारोको करण्यात आला होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात व धुमधडाक्यात साजरी करण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केल्यानंतर सोलापूर शहर व जिल्ह्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या तयारीत व्यस्त झाले आहेत. या आठवड्यात शिवजयंती व विधानसभेचे अधिवेशन होणार असल्याने त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाची रुपरेषा ठरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील आमदारांनी अधिवेशनात मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडावी यासाठी त्या-त्या तालुक्यातील मराठा समाजाने आमदारांना निवेदन दिले आहे. मंगळवारी (ता. २०) होणाऱ्या अधिवेशनात कोणते आमदार, काय भूमिका मांडतात? याकडे मराठा समाजबांधवांचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आवाहनामुळे मराठा समाज बांधव शांत आहेत. या आठवड्यात विधानसभेचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात सोलापुरातील आमदारांनी मराठा आरक्षणासाठी बाजू मांडावी यासाठी नुकतेच त्यांना निवेदन देण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी अधिवेशनात बाजू न मांडणाऱ्या किंवा आरक्षणाला विरोध करणाऱ्या आमदारांच्या विरोधातही लवकरच भूमिका घेतली जाणार आहे. मराठा आंदोलनाची दिशा व रुपरेषा लवकरच जाहीर केली जाईल.

- माऊली पवार, समन्वयक, सकल मराठा क्रांती मोर्चा, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT