सोलापूर

सोलापूरचे डिसले गुरुजी जगातील 50 शिक्षकांच्या यादीत 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांच्या यादीमध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा समावेश झाला आहे. त्यानिमित्त त्यांना 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कारही जाहीर झाला आहे. अशाप्रकारचा पुरस्कार मिळविणारे डिसले हे जिल्हा परिषदेचे एकमेव गुरुजी आहेत. 

शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाणारे "ग्लोबल टीचर प्राईझ' जाहीर झाले आहे. त्यात डिसले यांना नामांकन दिले आहे. लंडन येथील वाकी फौंडेशनच्या वतीने 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार त्यांना मे महिन्यात लंडन येथे होणाऱ्या ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम या कार्यक्रमात दिला जाणार आहे. 

लेट्‌स क्रॉस द बॉर्डर या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्राईल, पॅलेस्टाईन, अमेरिका व उत्तर कोरिया या जगातील सर्वांत अशांत देशांतील 50 हजार मुलांची पीस आर्मी तयार करून परस्पर सौहार्दाचे वातावरण करण्याच्या या शैक्षणिक प्रयोगाकरिता त्यांची निवड केली आहे. तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न इतर देशांतील शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे अशा शब्दात निवड समितीने त्यांचा गौरव केला आहे. 

जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत मागील 11 वर्षांपासून कार्यरत असणारे डिसले गुरुजी हे तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे जगभर ओळखले जातात. डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेड पुस्तके आज 11 देशांतील 10 कोटींहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते 150 हुन अधिक देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात. अशा पद्धतीने अध्यापन करणारे ते जगातील सातवे शिक्षक ठरले आहेत. मायक्रोसॉफ्ट, नॅशनल जिऑग्राफिक सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT