सोलापूर

सोलापूरच्या प्रश्नांवर पंतप्रधांनाशी चर्चा; खासदार डॉ. महास्वामी

सोलापूर जिल्ह्यास अध्यात्मिक पर्यटन केंद्र घोषित करावे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापुरातील टेक्‍स्टाईल व गारमेंट उद्योग, स्मार्ट सिटी, वंदे भारत रेल्वे, किसान रेल्वे, जिल्ह्यास अध्यात्मिक पर्यटन केंद्र घोषित करणे, महाराष्ट्रातील पाचही ज्योतिर्लिंगांचा विकास यांसह इतर प्रकल्पांच्या सद्यस्थितीबाबत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. (Discussion on solapur issues with PM modi MP Dr. jaisiddeshwar Mahaswami)

हिवाळी अधिवेशन(winter session) काळात संसदेत सोलापूरच्या प्रश्नाबाबत मांडणी केली. तसेच सोलापुरातील टेक्‍स्टाईल व गारमेंट उद्योग अडचणीतून सामना करीत आहे. लॉकडाउन व जीएसटी(GST) कारणाने वस्त्रोद्योग संकटात आहे. सोलापूर स्मार्ट सिटी(smart city solapur) अंतर्गत काही प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. मुंबई- सोलापूरसाठी वंदे भारत रेल्वे मंजूर होणे अत्यावश्‍यक आहे. तसेच सोलापूर ते आगरतला, सोलापूर ते नागरकोइल किसान रेल्वेची मागणी आहे. सोलापूर जिल्ह्यास अध्यात्मिक पर्यटन केंद्र घोषित करून केंद्र सरकारतर्फे सर्वतीर्थक्षेत्रांचा विकास व्हावा.

काशीप्रमाणे ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातील पाचही ज्योतिर्लिंगांचा विकास व्हावा, या विषयांवर चर्चा झाली. यासह इतर प्रकल्पांची सद्यस्थिती भविष्यात सोलापूरच्या विकासासाठी लागणाऱ्या महत्वाच्या मुद्द्यांची वेगाने सोडवणूक होण्यासाठी पंतप्रधानांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar यांची समजूत काढण्याचा प्रयत्न! ऑपरेशन टायगर फेल करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रात्रीत एक मोठी चाल

India Next ODI Series: अफगाणिस्तानला व्हाईटवॉश दिला, आता भारताची पुढची वनडे मालिका कधी? पाहा वेळापत्रक

Bulandshahr Kachori : चव अशी की विसरणार नाही! सकाळच्या नाश्त्यातली ही कचोरी आता पोहोचली परदेशात; बुलंदशहरची भन्नाट कहाणी

Pune Railway: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! तीन विशेष रेल्वे गाड्या नियमित; तिकीट दर होणार निम्मे, नेमकं कस आहे वेळाकपत्रक..

आजचे राशिभविष्य - 21 जून 2026

SCROLL FOR NEXT