Discussions are underway for Pandharpur Mangalwedha Assembly by election
Discussions are underway for Pandharpur Mangalwedha Assembly by election  
सोलापूर

विधानसभा पोट निवडणुकीत राजकीय दंगल, राजकीय नेत्यांच्या वावर..!

दावल इनामदार

ब्रह्मपुरी (सोलापूर) : पंढरपुर - मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षानी चंग बांधला असून निवडणुकीचे वारे आतापासूनच तापू लागले आहे. प्रथमच या पोट निवडणुकीत आवताडे गटाच्या दोन्ही भावामध्ये लढत पाहावयास मिळत असून कुठल्या उमेदवारास फटका बसणार ? कोण तारणार ? कोण बाजी मारणार ? मतदानरुपी कळणार आहे. मतदानाची जशी तारीख जवळ येईल तसे विविध पक्षाचे राजकीय नेत्यांच्या दौरे वाढले असून  आतापासूनच या निवडणुकीत आमदारकी पदरात पाडण्यासाठी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोराची तयारी करीत आश्वासनाची बरसात करीत असल्याचे दिसत आहे. 
 
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात वाढते दौरे, भेटीगाठी, उपस्थिती, मदत आतापासूनच दिसू लागली आहे. जो तो आपल्या परिने चंग बांधून तयारीत असून राजकीय दंगल पाहावयास मिळत आहे. सध्य ग्रामीण भागात कडक उन्हाचा चटका असल्यामुळे कॉर्नर सभा, वाडी वस्तीवर, चौक, झोपडपट्टी आदी भागात मतदान राजास भेटण्यासाठी गावं पुढारी, उमेदवार कसरत करत असून राजकीय पुढाऱ्यांचा घाम निघत आहे.

या पोट निवडणुकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे व राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यात तुल्यबळ लढत असली तरी अपक्ष  उमेदवार समाधान आवताडे यांचे बंधू सिद्धेश्वर आवताडे तसेच शैलजा गोडसे यांची उमेदवार अर्ज असल्यामुळे दोन्हीही पक्षातील उमेदवारास डोके दुःखी वाढली असून कोण किती मतदान आपल्या पदरात पाडतात हे ही पाहणे महत्वाचे आहे. त्यामुळे त्याचा फटका कोणास बसणार ? आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार ? आदी चर्चेस उधाण आले असून या निवडणुकीत चुरशीची राजकीय दंगल पाहावयास मिळत आहे.

जि. प. सदस्य शैला गोडसे आपल्या मतदार संघात रास्ता रोखो, मोर्चे, विविध विकास कामे, गाठी भेटी यामुळे कार्यकर्त्यांशी संपर्क ठेऊन आपले जाळे निर्माण केले आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून सिद्धेश्वर आवताडे यांची मंगळवेढा तालुक्यातील शहरात व ग्रामीण भागात संपर्क, युवकांची क्रेज म्हणून तरुण वर्गातून पाठिंबा मिळवत विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून केलेल्या कामाच्या जोरावर मतदार संघात प्रचार दौरा, गाठी भेटी यावर जोर दिला आहे.

मंगळवेढा मतदार संघ हा पूर्वीपासून खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षास मानणारा असून नगरपालिका ताब्यात आहे. या पक्षाने तालुका व ग्रामीण भागात संघटनेच्या निवडी, लोक चळवळ, मोर्चे, उपोषण, रास्ता रोखो अशा माध्यमातून आक्रमक असून पक्षाची फळी निर्माण केली आहे. फेसबुकवर व्हायरल होत असलेल्या 'महाराष्ट्रातील चार पक्षापैकी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र असतील तर तिथे कोणीही मायेचा लाल निवडून येणार नाही' अशी क्लिप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्टेटसवर ठेऊन प्रचारार्थ धुरळा उडवला आहे.

जनतेचे आमदार म्हणून ओळख असलेले स्व.भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवार देऊन विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीतील कार्यकर्ते नियोजनबध्द 'करेक्ट कार्यक्रम' करीत मतदार संघ पिंजून काढत आहे. विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक भाजपचे जवळीक असले तरी त्यांचा मंगळवेढा-पंढरपूर मतदार संघात चांगला संपर्क असून विविध सहकारी संस्थाच्या माध्यमातून उपस्थिती नगरपालिका, संपर्क कार्यालय यावर गाठी भेटीस जोर दिला आहे.

तसेच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना विजयी करण्यासाठी मतदार संघात गाठी भेटी, प्रचार दौरा करत व आपल्या कार्यकर्त्यांचा ताळ मेळ लावत भाजप उमेद्वार समाधान आवताडे यांना विजयी करण्यासाठी चंग बांधला असून तयारीला लागले आहेत. माघील निवडणुकीत 50 हजारापेक्षा अधिक मतदान असलेल्या मंगळवेढ़याचे भूमिपुत्र समाधान आवताड़े यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लड़वली होती. सध्या आवताडे गटाच्या ताब्यात दामाजी शुगर, पंचायत समिती, जि. प सभापती, सहकारी संस्था, अनेक ग्रामपंचायत असून त्यांनी आपल्या गटाचे शहरी व ग्रामीण भागात जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक तुल्यबळ व चुरशीच्या होणार असून पंढरपूर -मंगळवेढा ग्रामीण भागात 'आमदार आमचाच' होणार स्वप्नरूपी चर्चेला मात्र उधान आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT