कॉंग्रेसचा बदलणार जिल्हाध्यक्ष ! हसापुरे, धवलसिंह यांच्यात रस्सीखेच  Canva
सोलापूर

कॉंग्रेसचा बदलणार जिल्हाध्यक्ष ! हसापुरे, धवलसिंह यांच्यात रस्सीखेच

कॉंग्रेसचा बदलणार जिल्हाध्यक्ष ! हसापुरे, धवलसिंह यांच्यात रस्सीखेच

तात्या लांडगे

सुरेश हसापुरे पक्षात सक्रिय झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चेने जोर धरला.

सोलापूर : कॉंग्रेसच्या (Congress) वाट्याला जिल्ह्यातील सोलापूर लोकसभा मतदारसंघ, दक्षिण सोलापूर (South Solapur), अक्‍कलकोट (Akkalkot), शहर मध्य हे मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेसने ताकद टिकवली असून सध्या जिल्हा परिषदेत (Solapur Zilla Parishad) कॉंग्रेसचे सात सदस्य आहेत. तरीही, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) वाट्याला असलेल्या मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष का, असा प्रश्‍न कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघ तर माळशिरस, करमाळा, माढा, पंढरपूर-मंगळवेढा हे विधानसभा मतदारसंघही राष्ट्रवादीकडेच आहेत. तर सांगोला विधानसभा मतदारसंघ "शेकाप'कडे असून आगामी काळात त्या मतदारसंघावरही राष्ट्रवादी कॉंग्रेस हक्‍क सांगू शकतो. बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेना, भाजपची ताकद मोठी आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुलनेत कॉंग्रेसची ताकद म्हणावी तशी कधी दिसलीच नाही. ग्रामीणमध्ये मराठा, धनगर समाज निर्णायक असून त्यातील बहुतेक लोक राष्ट्रवादीमध्येच आहेत. दुसरीकडे, शहरात लिंगायत समाजाचे प्राबल्य असल्याने बहुतेकवेळा कॉंग्रेसने शहराध्यक्षपद त्यांनाच दिले. दरम्यान, सोलापूर लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतरही आमदारकीच्या निवडणुकीत विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांचा करिष्मा पक्षाला दिसला नाही. परंतु, सुरेश हसापुरे पक्षात सक्रिय झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चेने जोर धरला. शहरातील राजकारणापासून चार हात लांब राहिलेल्या हसापुरेंनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याशी थेट संपर्क ठेवला. या पार्श्‍वभूमीवर आता जेथे कॉंग्रेसची ताकद मोठी आहे, जे मतदारसंघ कॉंग्रेसचे असूनही त्या ठिकाणी आमदारकीत अपयश आले, तेथीलच जिल्हाध्यक्ष असावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तर शहराध्यक्ष बदलू नये, अशीही मागणी होत आहे.

दुसऱ्या कोणालाही द्या, पण धवलसिंहांना पद नको

कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी धवलसिंह मोहिते-पाटील, सुरेश हसापुरे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. मात्र, माळशिरसचे धवलसिंह मोहिते-पाटील सोडून दुसरीकडील कोणताही अध्यक्ष द्या, असे काही विद्यमान पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी तशी खंत विद्यमान पदाधिकाऱ्यांनी पक्षातील वरिष्ठांकडे व्यक्‍त केली आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या धवलसिंहांना पद देण्यापेक्षा मग, आता आहेत ते प्रकाश पाटील का चालत नाहीत, अशीही त्यांनी विचारणा केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आहे.

...ती चर्चा सुरेश हसापुरेंनीच घडवून आणली

सत्तेत नसतानाही वेळप्रसंगी विरोधकांना सोबत घेऊन सत्तेजवळ जाण्याचा करिष्मा करण्याची कला सुरेश हसापुरे यांच्याकडे आहे. दरम्यान, त्यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून जिल्ह्यातील काही तालुक्‍याध्यक्षांची बैठक घेतली. त्यावेळी काही तालुकाध्यक्षांनी प्रकाश पाटलांना हटवून हसापुरे यांना जिल्हाध्यक्ष करण्याची मागणी केली, अशी चर्चा झाली. मात्र, ज्या तालुकाध्यक्षांची नावे समोर आली, त्यांनी विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांना सांगितले की, आम्ही तसे काहीच बोललो नाही. हसापुरे यांनीच तशी चर्चा उठविल्याचेही सांगण्यात आले. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांपूर्वी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची खांदेपालट निश्‍चित आहे. त्यात हसापुरे बाजी मारणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT