सोलापूर

`या` कामांना दिला महापालिका आयुक्तांनी ग्रीन सिग्नल

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : भांडवली निधीतून सुचविण्यात आलेली कामे वर्कऑर्डर देऊन 31 मार्चअखेर पूर्ण करता येतील, अशा कामांना आयुक्त दीपक तावरे यांनी बुधवारी ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळे 2017-18 या कालावधीतील स्थगित करण्यात आलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय गटनेत्यांबरोबर चर्चा झाली. त्यानंतर आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गटनेते आनंद चंदनशिवे, रियाज खरादी, चेतन नरोटे उपस्थित होते. सुरू असलेली कामे रद्द करू नयेत, अशी मागणी सर्व गटनेत्यांनी केली. नगरविकास विभागाकडून विविध विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी वेळेत खर्च करण्याचे बंधन असते. पण राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधी वेळेत खर्च केला नाही. परिणामी, तब्बल तीन आर्थिक वर्षांतील निधी खर्च करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. 


शासनाने 2015-16, 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षांतील विकासनिधी खर्च करण्यासाठी मुदतवाढ 31 मे 2020 पर्यंत दिली आहे. हा निर्णय फक्त कार्यादेश देऊन सुरू झालेल्या पण पूर्ण न झालेल्या कामांसाठीच असणार आहे. त्यामुळे 2017-18 या आर्थिक वर्षात अभिप्राय दिलेले पण 27 फेब्रुवारी 2020 पर्यंत वर्कऑर्डर न दिलेल्या कामांना स्थगिती देण्यात आल्याचे श्री. तावरे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले होते. या प्रकरणी नगरसेवकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जी कामे मार्चपूर्वी पूर्ण होतील ती कामे करता येतील, असा आदेश आयुक्तांनी काढला आहे. आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचे नगरसेवकांनी स्वागत केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT