bharne mama 
सोलापूर

पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बांधावर खते वाटप 

प्रमोद बोडके

सोलापूर : येणारा काळ शेतकऱ्यांचा असेल, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, पीक पद्धती आणि योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. वडवळ (ता. मोहोळ) येथील भक्त निवासात कृषी विभागातर्फे आयोजित कृषी संजीवनी सप्ताह शुभारंभप्रसंगी श्री. भरणे बोलत होते.

यावेळी माजी आमदार राजन पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, तहसीलदार जीवन बनसोडे, सभापती रत्नमाला पोतदार, जि.प. सदस्य तानाजी खताळ, देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत शिवपूजे, उपसरपंच धनाजी चव्हाण, गटविकास अधिकारी अजिंक्‍य येळे, मृद शास्त्र विभागीय कृषी संशोधन केंद्राचे डॉ. बी. एस. कदम, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

पालकमंत्री भरणे म्हणाले, येणारे 25 दिवस कोरोनामुळे खूप धोक्‍याचे आहेत, गरज असेल तरच शहरात जावा. कोरोनाला घाबरू नका पण योग्य काळजी घ्या. एकत्र जमू नका, मास्कचा वापर, साबणाने स्वच्छ हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. श्री. पाटील म्हणाले, खते, बी-बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभागाचा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. नवतंत्रज्ञाचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी पीक लागवड करावी. साखरेच्या दराचे मूल्यांकन झाल्यास ऊस पीक फायदेशीर ठरणार आहे.

श्री. बिराजदार म्हणाले, कमी खतात जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा. कृषीमंत्री, आयुक्त, अधिकारी हे शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन पीक पद्धती, पाण्याचा वापर, सेंद्रिय खते यांची माहिती देत आहेत. जिल्ह्यात 147 मिमी पाऊस झाला असून 100 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. खतांची कोणतीही अडचण नाही, बियाण्यांच्या समस्याही सोडवल्या आहेत.

डॉ.. कदम यांनी ऊस लागवडीबाबत मार्गदर्शन केले. ऊस लागवडीसाठी कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या तंत्रज्ञाचा वापर आणि योग्य नियोजनाने अपेक्षित उत्पादन मिळत आहे. 4/5 वर्षात उसाच्या बेण्यामध्ये बदल करावा. जमिनीची उत्पादन क्षमता, लागवडीचे तंत्रज्ञान, पाणी नियोजन आणि अन्न द्रव्य व्यवस्थापन याकडे लक्ष दिल्यास उसाचे भरघोस उत्पादन वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना खते, बी-बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT