MPSC 
सोलापूर

"एमपीएससी परीक्षेबाबत माध्यमात फिरणारी "ती' बातमी खोटी ! कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना ड्यूटी दिलीच नाही'

विश्वभूषण लिमये

सोलापूर : रविवारी (ता. 21) झालेल्या एमपीएससी परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या 620 कर्मचाऱ्यांपैकी पाच कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली होती. मात्र, याबाबत जिल्हा प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली असून, संबंधित ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यांना ड्यूटीच देण्यात आली नसल्याचं स्पष्टीकरण उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिलं आहे. 

दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्यांचा अहवाल हा शनिवारीच आला असल्याने सोमवारी अहवाल प्राप्त झाल्याचा आरोपही सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून फेटाळण्यात आला आहे. 
त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

एका प्रसिद्धिमाध्याने, रविवारी (ता. 21) परीक्षा असताना कोरोनाचा अहवाल सोमवारी आल्याचे प्रसिद्ध केले होते व त्यात आठ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याचे प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली होती. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने याबाबत खुलासा केला आहे. 

याबाबत उपजिल्हाधिकारी वाघमारे म्हणाले, 21 तारखेला एमपीएससीच्या परीक्षा झाल्या. त्यासाठी 480 कर्मचाऱ्यांचा स्टाफ परीक्षा केंद्रांवर नेमण्यात आला होता. 605 लोकांना यासाठी नियुक्‍ती दिली होती. कोव्हिडच्या पार्श्‍वभूमीवर अतिरिक्त कर्मचारी घेतले होते. या सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट केली होती. यात तीन कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले. त्यातील दोघे जिल्हाधिकारी कार्यालयातील आहेत, त्यांना आम्ही ड्यूटी दिली नाही व एका कर्मचाऱ्याची ड्यूटी टेस्ट झाल्याबरोबरच कॅन्सल केली होती. सर्वांचे रिपोर्ट आम्हाला 20 तारखेलाच प्राप्त झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : पाकिस्तानमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यात ४ सैनिक ठार

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT