Collector Milind Shambharkar esakal
सोलापूर

चोखोबा स्मारक जागा निश्चितीत जिल्हाधिकाऱ्यांची मध्यस्थी!

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

प्रत्यक्ष स्थळ पाहणीसाठी आज गुरुवारी मंगळवेढ्यात येणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अजित जगताप यांनी दिली.

मंगळवेढा (सोलापूर) : प्रलंबित चोखोबा स्मारकाच्या (Chokhoba Monument) जागेवरील वादात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (DC Milind Shambharkar) यांनी मध्यस्थी करत हा प्रश्‍न चर्चेव्दारे सोडविला आहे. व्यापारी गाळे, पोलिस स्टेशन (Police station) पुर्ववत ठेवत उर्वरित जागेत स्मारक करण्याबाबत निर्णय घेतला. प्रत्यक्ष स्थळ पाहणीसाठी आज गुरुवारी मंगळवेढ्यात (Mangalwedha) येणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अजित जगताप यांनी दिली.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीस तहसिलदार स्वप्निल रावडे, मुख्याधिकारी निशीकांत प्रचंडराव, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, नगर प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, रतनचंद शहा बॅंकेचे अध्यक्ष राहुल शहा, अ‍ॅड. नंदकुमार पवार, पक्षनेते अजित जगताप, अविनाश शिंदे, जयराज शेंबडे, पिंटू खटावकर, अरुण किल्लेदार, नारायण बजाज, पठाण शिवशरण, मारुती वाकडे, राजाराम सुर्यवंशी, प्रविण हजारे उपस्थित होते. चोखोबा स्मारकांचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता. हे स्मारक समाधी परिसरात व्हावे जेणेकरुन भाविक पर्यटकास समाधी स्थळ व अन्य माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल, अशी मागणी होती.

या परिसरात असलेल्या व्यापारी गाळे हटविल्यानंतर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न होता. त्यांनी आपली उपजिविका कायम ठेवत याच परिसरात स्मारक केल्यास भाविकाकडून व्यवसायिक व्यवसायरुपी मदत होईल. शहरातील प्रमुख शासकीय कार्यालये बाहेर गेल्यामुळे अनेक व्यावसायिकांचे स्थलांतर झाले तर समाधी परिसरातील जागा तोकडी असल्याने काहीची मागणी पोलिस वसाहतीजवळ करण्याची होती. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (DC Milind Shambharkar) यांनी यात मध्यस्थी करत समाधी परीसरातील शिक्षण मंडळ, सार्वजनिक बांधकाम, तलाठी कार्यालयाच्या जागेत करताना व्यापाऱ्याची उपजिविका कायम ठेवत पोलिस स्टेशन व गणेश मंडळाची जागा कायम ठेवत, त्या जागेत स्मारक करण्याबाबत तोडगा काढला व त्या जागेची पाहणी करुन 10 दिवसात प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे. येथील बसवेश्‍वर व चोखोबा स्मारकांचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षापासून गाजत आहे. यासाठी विधानसभेत स्व. आ. भारत भालके व आ. समाधान आवताडे यांनी प्रश्‍न उपस्थित केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT