Diwali bonus was distributed to all the employees of the temple committee at Akkalkot.jpg 
सोलापूर

कोरोना काळातही वटवृक्ष देवस्थानच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोडच

चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कर्मचारी व सेवेकऱ्यांना दिवाळीनिमित्त देवस्थानच्यावतीनेे माहे ऑक्टोबर महिन्याचा वेतन व  बोनस (दिवाळी स्वामीप्रसाद) एकत्रितपणे वितरण करण्यात आले. यावेळी मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळेे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील स्वामी भक्त अॅड. मधुकर वैद्य व सहकारी यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे मिठाई वाटपही अॅड. राजन पाटणकर, नुतन पाटणकर, मधुकर वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना मधुकर वैद्य यांनी श्री स्वामी समर्थांचे आपण निस्सिम भक्त आहोत. स्वामींच्या सेवेतच आपले जीवन व्यतीत करणाऱ्या सेवेकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, या हेतूने देवस्थानच्यावतीने बोनस व आमच्यावतीने मिठाई वाटप करुन देवस्थानच्या सेवेकऱ्यांची दिवाळी गोड केल्याचे समाधान आम्हास व देवस्थान समितीस असल्याचे सांगीतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने महेश इंगळे यांनी मधुकर वैद्य व कुटूंबीयांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देवून यथोचित सन्मान करुन वैद्य कुटूंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सर्व सेवेकरी व कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन, मास्क व सॅनिटायझर वापरून या स्वामी प्रसाद (बोनस) वेतन व मिठाईचा लाभ घेतला. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, मधुकर वैद्य व कुटूंबीय, गिरीश पवार, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव आदी उपस्थित होते.


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT