Diwali holidays from today Schools will reopen on November 22 prasad mirkale sakal
सोलापूर

Diwali Holiday : दिवाळीच्या आजपासून सुट्या; २२ नोव्हेंबरला भरतील शाळा

शासकीय यादीनुसार निर्णय : नोव्हेंबर महिन्यातील २६ व २७ तारखेला सलग सुट्या

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सहामाही परीक्षा संपल्यानंतर आता उद्यापासून (ता. ८) शाळांना दिवाळीच्या सुट्या असतील. शासकीय सुट्यांच्या यादीनुसार २२ नोव्हेंबरला शाळा सुरू होतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी स्पष्ट केले आहे.

नोव्हेंबर महिन्यातील २६ व २७ तारखेला सलग सुट्या आहेत. त्यामुळे ९ ते २५ नोव्हेंबर या काळात सुट्या द्याव्यात, अशी मागणी काही शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली होती. त्यामुळे सुटीबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. महापालिकेच्या शिक्षण मंडळाला प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा होती. माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या सहामाही परीक्षा संपूनही सुट्यांचा तिढा कायम होता.

त्यावर मंगळवारी (ता. ७) प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी स्पष्टीकरण दिले. शासनाकडून प्राप्त झालेल्या वार्षिक कॅलेंडरमधील शासकीय सुट्यांनुसारच शाळांना दिवाळी सुटी असेल, असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार महापालिकेच्या शिक्षण मंडळाने सर्व मुख्याध्यापकांना तसे कळविले. जिल्हा परिषदेच्या शाळा, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनाही याच काळात सुटी असणार आहे.

‘या’ कारणामुळे सुट्यांमध्ये फेरबदल नाही

गणेशोत्सव काळात २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद दोन्ही सण एकाचवेळी आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलाद साजरी झाली. त्या दिवशी एक शासकीय सुटी देण्यात आली होती. त्यामुळे आता दिवाळी सुट्यांमध्ये फेरबदल केल्यास पुढे एक सुटी जास्त होण्याची शक्यता होती.

पुढे शासकीय सुट्यांमधील एकही सुटी रद्द करण्यासारखा दिवस नव्हता. त्यामुळे दिवाळी सुट्यांमध्येही बदल करण्यात आला नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. वर्षात एकूण ७६ सुट्या असतात, त्यापेक्षा एकही सुटी जास्त होणार नाही, अशी नियमावली आहे. जास्त सुटी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ होवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT