vari2.jpg 
सोलापूर

फेसबुकवर होणार ज्ञानेश्‍वरीची निरूपणे 

सकाळ वृत्तसेवा

नातेपुते(सोलापूर)ः आषाढी वारीत जगभरातील वैष्णवांना वारीचा घरबसल्या आनंद घेता यावा या हेतूने श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी, श्रीक्षेत्र आळंदी व महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील नामवंत तरुण प्रवचनकारांचे श्री ज्ञानेश्‍वरी ग्रंथावर निरूपण फेसबुक थेट पाहता येणार असल्याची माहिती ज्ञानेश्‍वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्‍वस्त डॉ. विकास ढगे-पाटील यांनी दिली. 

डॉ. ढगे-पाटील म्हणाले, शेकडो वर्षांची वारीची परंपरा यावर्षी कोरोना जागतिक संकटाने मोडते की काय? अशी भीती प्रत्येकाच्या मनात आहे. 
परंतु, श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी व महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाने जगभरातील वैष्णवांना आषाढी वारीत पायी चालायला मिळणार नसले तरी घरात बसून मनाने वारीत बरोबर राहण्यासाठी श्री ज्ञानेश्‍वरी ग्रंथावर निरूपण हा उपक्रम हाती घेतला आहे. श्री ज्ञानेश्‍वरी ग्रंथ निरूपण पालखी सोहळा  https://m.facebook.com/palkhisohalapatrakarsangh या फेसबुक पेजवर शनिवार 13 जूनला माउलींचा प्रस्थान सोहळा ते बुधवार 1 जुलै आषाढी एकादशीपर्यंत असे 19 दिवस दररोज सायंकाळी 4 ते 5 या वेळेत थेट प्रसारण केले जाणार आहे. 

या सोहळ्यात रोज ज्ञानेश्‍वरी अध्यायाचे निरूपण केले जाणार आहे. यात जयेश महाराज भाग्यवंत डोंबिवली, जगन्नाथ महाराज गर्जे पाथर्डी, किशोर महाराज खरात सिन्नर, भानुदास महाराज टेंबुकर पंढरपूर, योगेश महाराज गोसावी पैठण, स्वप्नील महाराज कापशीकर पुणे, विजय महाराज खवले मोताळा जि. बुलढाणा, विशाल महाराज खोले मुक्ताईनगर, योगेश महाराज जाधव नगर, सुरेश महाराज सूळ अकलूज, समाधान महाराज शर्मा केज, जि. बीड, सचिन महाराज पवार पुणे, बंडू ऊर्फ विनायक महाराज चौगुले खोची जि. कोल्हापूर, कृष्णा महाराज चवरे पंढरपूर, प्रमोद महाराज राहणे अकोला, प्रशांत महाराज ताकोते अकोला, ज्ञानेश्‍वर महाराज पाटील बावी जि. सोलापूर, रविदास महाराज शिरसाठ आळंदी यांची दररोज एका अध्यायावर निरूपणे होणार आहेत. ज्ञानेश्‍वरी ग्रंथ निरूपण ऐकण्याची तसेच दररोज वारीतील क्षणचित्रे पाहण्याची संधी फेसबुक पेजवर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी सांगितले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : 15 सप्टेंबरच्या निर्णयानंतर UPI पेमेंटवर MDR शुल्क; PhonePe-Google Payच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता

Diwali Railway Tickets : दिवाळीच्या रेल्वे तिकिटांना आतापासूनच प्रतीक्षा ; आरक्षण सुरू होताच पाच मिनिटांत ‘रिग्रेट’; लांब पल्ल्याच्या गाड्यांना मागणी

Pune Bridge Repairs : पुण्यातील २१ पुलांची दुरुस्ती आयुर्मान वाढण्यास मदत; दरवर्षी होणार नियमित तपासणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांचा आजपासून दुष्काळ पाहणी दौरा

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT