high court sakal
सोलापूर

प्रशासक नियुक्तीत मंत्र्यांना हस्तक्षेपाचा अधिकार आहे का?

उच्च न्यायालयाचा सवाल : दूध संघ प्रशासक पापळ यांना कामकाजास मनाई

प्रमोद बोडके,

सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया सहकारी संघावर प्रशासक म्हणून शिवराम पापळ यांना नियुक्त करण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा किंवा मंजुरी देण्याचा अधिकार राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना आहे का?, मंत्र्यांनी प्रशासक नियुक्तीत हस्तक्षेप करण्याचा कायदेशीर अधिकार कायद्यात आहेत का ? या बद्दल बुधवारपर्यंत (ता. 6) प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश आज उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. जे. काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी दिले आहेत.

दूध संघाचे प्रशासक पापळ यांच्या नियुक्‍ती विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये हे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासक म्हणून शिवराम पापळ यांना नियुक्त करण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा किंवा मंजुरी देण्याचा अधिकार राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना आहे का?, मंत्र्यांनी प्रशासक नियुक्तीत हस्तक्षेप करण्याचा कायदेशीर अधिकार कायद्यात आहेत का ? या बद्दल खुलासा आज सरकारी वकिलांना करता आला नाही.

तशी तरतूद असल्याचेही आजच्या सुनावणीत दाखवता आले नाही. जो पर्यंत याचिकेची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रशासक पापळ यांनी प्रशासक म्हणून कामकाज करू नये असे निर्देशही देण्यात आले आहेत. दूध संघावर पूर्वी असलेल्या तीन शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय मंडळाने या कालावधीत काम करावे, त्यांनी प्रशासक म्हणून काम करताना कोणतेही धोरणात्मक आणि आर्थिक निर्णय घेऊ नयेत असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. या याचिकेवर आता पुढील सुनावणी बुधवारी (ता.6) होणार आहे. याचिकाकर्त्यांचे वकील म्हणून ऍड. आळंगे यांनी तर दूध संघाचे वकील म्हणून ऍड. अभिजित कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT