Do not allow the outside people of Pargaon to stay in monasteries, hospices Order of Pandharpur Municipality 
सोलापूर

मठ, धर्मशाळांमध्ये परगावच्या लोकांना राहण्यास परवानगी देऊ नका; पंढरपूर नगरपालिकेचा आदेश

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  शहरातील मठ, धर्मशाळा आणि खासगी इमारतीमध्ये यापुढील काळात परगावच्या लोकांना राहण्यास परवानगी देऊ नये. अशा आशयाच्या नोटिसा नगरपालिकेने पंढरपूर शहरातील सुमारे साडेचारशे मठ आणि ज्या इमारतीमध्ये परगावचे लोक येऊन राहतात त्यांना देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. परगावचे लोक राहत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित मठ मालक आणि खाजगी इमारतीच्या मालकांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी दिली.

पंढरपूर शहर आणि तालुक्यात आतापर्यंत सात व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेली आहेत. दुसरीकडे आषाढी यात्रा जवळ येऊ लागलेली आहे. यात्रा होणार नसली तरी दरवर्षीप्रमाणे काही भाविक पंढरपूर येथे येण्याची शक्‍यता आहे. दरवर्षी चातुर्मासात शेकडो भाविक पंढरपुरात मुक्कामास असतात. सध्या
 कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नगरपालिकेने काही उपाययोजना सुरू केल्या आहेत.

शहरातील सुमारे साडे चारशे मठ आणि धर्मशाळा तसेच ज्या खासगी इमारतीमध्ये परगावाहून लोक येऊन राहतात त्याचा सर्व्हे करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकाऱ्यांनी पंढरपूर नगरपालिकेला दिले आहेत. त्यानुसार विविध मठ, धर्मशाळा आणि खाजगी इमारतीत राहत असलेल्या लोकांची माहिती संकलित केली जात आहे. 

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर यापुढे  शहरातील मठ, धर्मशाळा आणि खाजगी इमारतीत पर जिल्ह्यातून आणि परराज्यातून आलेल्या लोकांना पोलीस आणि महसूल विभागाच्या परवानगी शिवाय राहता येणार नाही. परवानगी न घेता अशा पद्धतीने कोणी व्यक्ती राहत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांच्या विरोधात राष्ट्रीय व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई केली जाणार आहे असे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी स्पष्ट केले. मालकांना आणि विश्वस्तांना पंढरपूर नगरपालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT