Do you know this short key for WhatsApp 
सोलापूर

व्हॉट्‌सऍपचे हे शॉर्ट की तुम्हाला माहित आहेत का? 

अशोक मुरूमकर

सोलापूर : स्मार्ट फोनमध्ये सर्वात लोकप्रिय झालेल्या व्हॉट्‌सऍपने आता नवीन शॉर्ट की आणले आहेत. आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्हॉट्‌सऍप सतत नवीन काहीतरी आणत असते. आता असेच वेब व्हॉट्‌सऍप धारकांसाठी व्हॉट्‌सऍपने शॉर्ट की आणले आहेत. त्यामुळे तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर व्हॉट्‌सऍप वापरत असाल तर तुम्हाला प्रत्येकवेळी माऊसची गरज पडणार नाही. कीपॅडवरून तुम्ही शॉर्टकट वापरू शकणार आहात. 
व्हॉट्‌सऍपमध्ये सतत नवीन काही तरी बदल होत असतात. नेटिजन्सही "नवं ते हवं' म्हणत त्याचा स्वीकार करतात. आता असाच हा एक नवीन फिचर आहे. त्यामुळे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर शॉर्टकट वापरून व्हॉट्‌सऍप वापरता येणार आहे. 

असे वापरा वेब व्हॉट्‌सऍप... 
गुगलवरून वेब व्हॉट्‌सऍप सर्च केल्यानंतर मोबाईलमधील व्हॉट्‌सऍपच्या उजव्या सर्चच्या बाजूला असलेल्या तीन ठिंबावर टच केल्यानंतर न्यू ग्रुप, न्यू ब्रॉडकास्ट आणि त्यानंतर व्हॉट्‌सऍप वेब येते. त्यावर टच केल्यानंतर क्‍युआर कोड स्कॅन केल्यानंतर तुमचे व्हॉट्‌सऍप कॉम्प्युटरला कनेक्‍ट होते. त्यानंतर ते ऑपरेट करण्यासाठी माऊसचा वापर करावा लागतो, मात्र त्यासाठीही व्हॉट्‌सऍपने शॉर्ट की दिल्या आहेत. 
 
असे आहेत शॉर्ट की... 
न्यू चॅट : AlT Ctrl n 
प्रोफाईल आणि अबाऊट : Alt Ctrl p 
सर्च : Alt Ctrl / 
अर्काइव्ह चॅट : Alt Ctrl # 

र्‌ अन रेड : Alt Ctrl U 
नेक्‍ट चॅट : Alt Ctrl Tab 
नवीन ग्रुप : Alt Ctrl N 
सेटिंग : Alt Ctrl , 
सर्च चॅट : Alt Ctrl F 
म्युट : Alt Ctrl M 
डीलीट चॅट : Alt Ctrl Backspace 
प्रीव्हाईज चॅट : Alt Ctrl Shift Tab

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टातल्या टायपिस्टला ४ जॅकेट अन् तासाला १ हजार दिले, AI वापरून याचिका; १२वी पास तरुणाला सरन्यायाधीशांनी झापलं

भारताला जेतेपदाच्या हॅट् ट्रिकची संधी! T20 World Cup 2028 साठी १२ संघ पात्र, कसा असेल उर्वरित ८ जागांसाठीचा मार्ग?

छत्रपती संभाजीनगर हादरलं! ठाकरे गटाच्या उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकू हल्ला

'तन्वी प्रत्येक भांडणाआधी जाणीवपूर्वक स्मोक करून यायची' बिग बॉसच्या घराबाहेर पडताच रुचिताचा मोठा खुलासा, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : सोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणी

SCROLL FOR NEXT