Do you know these things of Vithuraya in Pandharpur 
सोलापूर

Video : पंढरपुरातील विठूरायाच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : विठुराया उठतो केव्हा... झोपतो केव्हा... दररोज विठुरायाचा पोशाख केव्हा बदलला जातो... हिवाळ्यात त्याचा पोशाख कसा असतो... यात्रेनंतर थकलेल्या विठुरायाला कोणता काढा दिला जातो... ऋतुमानानुसार विठुरायाच्या आहारात कोणते बदल केले जातात. याविषयी ’सकाळ’ने घेतलेला हा आढावा....
‘यथा देहे तथा देवे’ या उक्तीप्रमाणे आपण जसे ऋतुमानानुसार पोशाखात आणि आहारात बदल करतो. तसेच विठुरायाच्या देखील पोशाखात आणि नैवेद्यात बदल केले जातात. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात देवाची विशेष काळजी घेतली जाते.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर 17 मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. तथापि मंदिरातील काकडा नित्य पूजा, नैवेद्य, पोशाख,  धुपारती आणि शेजारती हे नित्योपचार प्रथेप्रमाणे सुरू आहेत. दररोज पहाटे साडेतीन वाजता मंदिराचे दरवाजे उघडले जातात. पहाटे चार वाजता काकड आरती सुरू होते. त्यानंतर नित्य पूजा केली जाते. यावेळी देवाला पंचामृताचा अभिषेक केला जातो. तांदळाची खिचडी, तूप, दही, पापड, लोणचे असा प्रसाद दाखवला जातो. दुपारी साडेअकरा वाजता देवाला पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. हिवाळ्यात पंचपक्वान्न आत बासुंदी चा समावेश असतो तर उन्हाळ्यात बासुंदी ऐवजी श्रीखंड आणि आमरसाचा समावेश केला जातो. दुपारी साडेचार वाजता देवाचा पहिला पोषाखा काढून नवीन पोशाख आणि अलंकार घातले जातात. सायंकाळी सात वाजता धुपारती केली जाते आणि रात्री ११ वाजता विठुराया झोपण्यापूर्वी शेजारती करून रात्री बाराच्या सुमारास मंदिर बंद केले जाते.

आषाढी आणि कार्तिकी यात्राकाळात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी अहोरात्र उघडे ठेवले जाते. यात्रेनंतर प्रक्षाळ पूजा दिवशी श्री विठ्ठलाचा थकवा काढण्यासाठी गवती चहा, लवंग, वेलदोडे, दालचिनी तसेच विविध 18 वनस्पतींपासून बनवलेला काढा देवाला दाखवण्याची प्रथा आहे.

वैशिष्ट्यपूर्ण प्रथा- परंपरा
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रथा-परंपरा आहेत. त्या प्रथा परंपरा पाळत असतानाच राष्ट्रीय सण, उत्सव या दिवशी मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांची मनमोहक आरास केली जाते.
- विठ्ठल तथा सुनील जोशी, 
कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT