Online Dog Story.jpeg 
सोलापूर

सोलापुरात कुत्ता गॅंगची दहशत : महापालिकेच्या निर्बीजीकरण मोहिमेत खंड 

जगन्नाथ हुक्केरी

सोलापूर : गली मे कभी कभी कुत्ता भी शेर होता है। हे वाक्‍य वाचून आश्‍चर्य वाटेल. पण ही सोलापूर शहरातील वस्तुस्थिती आहे. याचा अनुभव घ्यायचा असेल, तर रात्री रस्त्यावर या. नक्‍कीच कुत्र्याच्या अंगात शेर अवतरल्याची प्रचिती येईल. या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका झाली, तर ते खरोखर नशिबवान. चौक असो की गल्ली तेथे कुत्ता गॅंगची दहशत आहेच. चवताळत अंगावर येतात आणि समोर येईल त्याला चावा घेतल्याशिवाय ते राहतच नाहीत. 

शहरातील प्रत्येक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर धोकादायक ठरत आहे. कधी, कुठून येत हल्ला करतील, याचा नेम नाही. आधी एक कुत्रा भुुंकला त्याच्या मागोमाग गोतावळा येतोच. त्यानंतर गल्लीबोळातील कुत्रे त्यांचा पाठलाग करीत त्यांच्या भुंकण्याच्या स्वरात सूर मिसळत गळा काढतात. अशा स्थितीत त्यांच्यासमोर एकादा माणूस, दुचाकीस्वार किंवा लहान मुले आल्यास चवताळून त्यांच्यावर हल्ला केल्याशिवाय राहत नाहीत. या कुत्र्यांना आवरण्यासाठी महापालिकेकडे विशेष यंत्रणा आहे. मात्र वाढत्या कुत्र्यांच्या वंशावळीमुळे हा विभाग कुत्र्यांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करतोय की, त्यांची वंशावळ वृद्धीसाठी कार्य करतोय, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरितच आहे. ऍनिमल रहात मात्र यासाठी मोठ्या प्रमाणात काम करते. त्यासाठी त्यांची मदत जर महापालिका घेतल्यास शहरातील कुत्ता गॅंगची दहशत कमी करण्यास खरोखरच मदत मिळणार आहे. 

ठेकेदार अडचणीत 
महापालिका हद्दीमध्ये 42 हजार मोकाट कुत्रे आहेत. प्रत्येक वर्षी आठ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे टार्गेट असते. दोन वर्षांपूर्वी 70 लाख रुपयांचा ठेका देउन आठ हजार कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्यात आले. मात्र अद्यापही या कुत्र्यांच्या वंशावळ वृद्धीवर आळा घालता आला नाही. सर्वात कहर म्हणजे ठेकेदारांची बिलेही अद्याप दिली नाहीत. 

हल्ल्यांचेही प्रमाण अधिक 
प्रत्येक वर्षी लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यत सहा ते सात हजार जणांवर हे कुत्रे हल्ले करतात. काही कुत्र्यांना रेबिज असल्याने सिव्हील व महापालिकेच्या दवाखान्यात उपचार घेउन ते बरे होतात. मात्र अद्यापपर्यंत एकाचाही मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब आहे. 

आकडे बोलतात..... 
मोकाट कुत्रे 
42 हजार 
वर्षभरातील व्यक्‍तींवरील हल्ले 
7 हजार 
दरवर्षीचे निर्बीजीकरण टार्गेट 
8 हजार 
महापालिकेचे वार्षिक बजेट 
70 लाख 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT