004_0 (2).jpg 
सोलापूर

डॉग स्कॉडने केला बिबट्या ट्रॅप ! वन विभागाने 'अशी' केली कारवाई फत्ते

तात्या लांडगे

सोलापूर : बीड, नगरमार्गे करमाळ्यात दाखल झालेल्या बिबट्याने सहा जणांचा बळी घेतला होता. करमाळ्यात आल्यानंतर त्याने तिघांचा जीव घेतला. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी बिबट्याला पकडण्यापेक्षा ठार मारण्याची मागणी लावून धरली आणि वन विभागावर दबाव वाढला. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्याची परवानगी मागितली. शार्प शुटरसह वन विभागाने 100 कर्मचाऱ्यांची 16 पथके तयार केली. पायी गस्त घातली आणि गुरुवारी (ता. 17) बिबट्याला कॅमेऱ्यात वांगी परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. डॉग स्कॉडनेही लोकेशन ट्रेस केल्याने बिबट्याचा ठावठिकाणा लागला. शुक्रवारी (ता. 18) बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्यात वन विभागाला यश मिळाल्याचे उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

उपवनसंरक्षक पाटील म्हणाले...

  • सहा जणांचा बळी घेऊन बीड, नगरमार्गे करमाळ्यात दाखल झाला होता बिबट्या
  • दोन जिल्ह्याचा प्रवास करुन करमाळ्यात आलेल्या बिबट्याने तिघांचा बळी घेतल्यानंतर वन विभागावर वाढला होता दबाव
  • गोळ्या घालण्याची परवानगी मिळाल्यानंतर वन विभागाच्या 100 कर्मचाऱ्यांकडून सुरु झाला बिबट्याचा शोध
  • 16 पथकांची नियुक्‍ती करुन दिवस- रात्री गस्त केली होती सुरु; दोन डॉग स्कॉडचीही केली होती नियुक्‍ती
  • सीसीटिव्ही कॅमेरे जागोजागी लावून वांगी परिसरात वाढविली होती गस्त
  • वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मागील दोन दिवसांत केला 90 ते 100 किलोमीटरचा प्रवास
  • काल रात्री (गुरुवारी) दहा वाजता वांगी परिसरात दिसला होता बिबट्या
  • डॉग स्कॉडच्या मदतीने बिबट्याला केले होते गुरुवारी रात्रीच ट्रॅप; आज गोळ्या घालून ठार मारले

करमाळ्यातील वांगी क्र. चार येथील पांडूरंग राखुंडे यांच्या केळीच्या बागेत बसलेल्या बिबट्याचा खात्मा करण्यात आला. तत्पूर्वी, बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पथके नियुक्‍त करुन गस्त सुरु केल्यानंतर बिबट्या वारंवार त्याची जागा बदलू लागला होता. आठ- दहा दिवसांत त्याचे हल्ले कमी झाले, परंतु त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. कोणला तरी तो भक्ष्य करतो की काय, याची भिती, धास्ती सर्वांनाच होती. वाहने सर्वत्र जाऊ शकत नसल्याने बॅटरी, कंदिलच्या सहायाने वन विभागाचे शंभर कर्मचारी रात्रंदिवस शेतात गस्त घालत होते. गावकऱ्यांचीही त्यांनी मदत घेतली. याचवेळी वन विभागाने बिबट्याचा वावर असल्याचा संशय असलेल्या ठिकाणी 500 मीटरच्या अंतरावर सीसीटिव्ही कॅमेरे लावले. बिबट्याचा थांगपत्ता लागत नसल्याने वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चिंता वाढू लागली. अखेर गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि डॉग स्कॉडने त्याचा ठिकाणा पक्‍का केला. त्यानंतर त्याला ठार करण्यात शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास यश मिळाले. आता मृत बिबट्याला सोलापुरात आणले असून पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याचे शवविच्छेदन करुन 'एनटीसीए'च्या निर्देशानुसार त्याची विल्हेवाट लावली जाईल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT