नोकरी करत उभारले बायोटेक पार्क! संशोधनातून शेतकऱ्यांची सेवा Canva
सोलापूर

नोकरी करत उभारले बायोटेक पार्क! संशोधनातून शेतकऱ्यांची सेवा

नोकरी करत उभारले बायोटेक पार्क! संशोधनातून शेतकऱ्यांची सेवा

प्रकाश सनपूरकर

बदलत्या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना थेट मिळवून देण्यासाठी करकंबच्या आदित्य गुळमे यांनी बायोटेक पार्कच्या माध्यमातून उभे केलेले स्टार्टअप स्थानिक शेतकऱ्यांसाठी प्रगतीचा आधार बनू लागले आहे.

सोलापूर : बदलत्या तंत्रज्ञानाचा (Technology) फायदा शेतकऱ्यांना थेट मिळवून देण्यासाठी करकंबच्या आदित्य गुळमे (Aditya Gulme) यांनी बायोटेक पार्कच्या (Biotech Park) माध्यमातून उभे केलेले स्टार्टअप (Startup) स्थानिक शेतकऱ्यांसाठी प्रगतीचा आधार बनू लागले आहे. आदित्य गुळमे हे पाच दिवस पुण्यात राहून दोन दिवस गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला बायोटेक्‍नॉलॉजी (Biotechnology) तंत्राद्वारे उत्पादन वाढीचा लाभ मिळवून देत आहेत.

आदित्य गुळमे हे मूळचे करकंबचे रहिवासी. लोकमंगल महाविद्यालय व शिवदारे महाविद्यालयात त्यांनी बायोटेक्‍नॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांना शासकीय नोकरी मिळाली. पण नोकरीच्या मर्यादा पाहता बदलत्या जगासोबत नवे काही करायचे असेल तर खासगी क्षेत्रात उतरले पाहिजे, असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी नोकरी सोडून खासगी कंपनीत नोकरी सुरू केली. शेतीमध्ये बायोटेक्‍नॉलॉजीचा उपयोग करून शेतकऱ्यांना फायदा द्यायचा असेल तर त्यासाठी करकंबमध्ये येऊन काम करण्याचे त्यांनी ठरवले. करकंबमध्ये त्यांनी एक पॉलिहाऊस सुरू केले. त्यामध्ये चार लाख रोपांची क्षमता आहे. ऊस, टोमॅटो, ढोबळी मिरची, पत्ता कोबी आदींची रोपे त्यांनी विकसित केली. या रोपांच्या वाढीसाठी त्यांनी नॅनोटेक्‍नॉलॉजीचा वापर सुरू केला. पण रोपे देणाऱ्या शेतकऱ्याला केवळ सल्ला न देता त्याचे अपेक्षित उत्पादन हाती येईपर्यंत सर्व प्रकारची मदत करण्याचे त्यांनी ठरवले.

नोकरीमुळे त्यांना मर्यादा होती. मग त्यांच्या वडिलांनी त्यांना मदत सुरू केली. जानेवारीत हे काम सुरू केल्यानंतर त्यांना टोमॅटोच्या पिकाबद्दल प्रयोग करता आले. पीक येण्याचा कालावधी आठ दिवसांनी कमी झाला व उत्पादन 50 टन एकरी काढता आले. त्यासाठी त्यांना रोपांवर 14 प्रकारच्या नॅनोपार्टिकलची ट्रीटमेंट केलेली होती. नंतर उसाच्या बाबतीत त्यांनी योग्य नियोजन करून किमान 100 टन एकरी उत्पादन घेण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. या संशोधनात गॅस क्रोमॅटोग्राफी, हायपरप्रेशर लिक्विड क्रोमॅटोग्राफीचा उपयोग केला. आता शेतकऱ्यांनी त्यांना माती परीक्षण, द्राक्षाचे पान-देठ तपासणी, पाणी परीक्षण सेवांची मागणी केली आहे.

आदित्य गुळमे यांची कामगिरी

  • अद्ययावत शेती तंत्र थेट गावातील शेतीत प्रत्यक्षात आणणे

  • शेतकऱ्यांना केवळ सल्ले न देता पीक हाती येईपर्यंत पूर्ण मदत करणे

  • शेतकऱ्यांचा माल विक्री, निर्यातीसाठी योग्य संस्थांशी जोडणे

  • कमीत कमी रासायनिक खतांचा वापर

  • तंत्राचा वापर करून अधिकाधिक उत्पादन वाढवणे

जगातील तंत्राचे व बाजाराचे बदल समजून घेण्यासाठी मी पुण्यात नोकरी सांभाळतानाच शेतकऱ्यांना फायदा देण्यासाठी माझ्या गावातील शेतकऱ्यांसाठी काम करतो आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी व समाजाच्या आरोग्यासाठी अविरत काम करीत आहे.

- आदित्य गुळमे, संचालक, बायोटेक पार्क, करकंब, जि. सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT