2sakalexclusive_19.jpg 
सोलापूर

कोरोना लपवू नका ! लक्षणे असतानाही आजार अंगावर काढलेल्या 'इतक्‍या' रुग्णांनी गमावला जीव 

तात्या लांडगे

सोलापूर : शहर-जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. लक्षणे असलेल्यांनी तत्काळ उपचार घ्यावेत, असे आवाहन करूनही कोरोना लपविणाऱ्यांची संख्या मोठी राहिली आहे. या पार्श्‍वभूमीवर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये अशा व्यक्‍तींचाच सर्वाधिक समावेश असल्याची बाब अहवालावरून समोर आली आहे. आतापर्यंत शहर-जिल्ह्यातील एक हजार 919 मृत्यूमध्ये उपचारासाठी दाखल झाल्यानंतर 28 तास ते 72 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये 683 रुग्णांचा समावेश असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

वेळेत करून घ्यावे निदान 
लक्षणे असलेल्यांनी तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळेत उपचार घ्यावेत. जेणेकरून रिस्क कमी राहील आणि कोरोनामुळे मृत्यू होणार नाही. उपचारासाठी विलंबाने दाखल झाल्याने अनेकांचे मृत्यू झाले आहेत. 
- डॉ. बिरूदेव दुधभाते, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका 

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने एक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये उपचारासाठी दाखल झाल्यानंतर 24 तासांत, 24 ते 48 तासांत, 48 ते 72 तासांत आणि तीन ते सात दिवस व सात दिवसानंतर मृत्यू होणाऱ्यांची आकडेवारी स्वतंत्र नोंदविण्यात आली आहे. कोरोना झाल्यानंतरही लक्षणे लपवून आजार अंगावर काढत बिनधास्तपणे घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय दिसत आहे. कोरोनाच्या विषाणूचा अंगात मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्यानंतर अनेकजण उपचारासाठी दवाखान्यात दाखल होत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. तीन ते सात दिवस अथवा सात दिवसानंतर मृत्यू होणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. मात्र, उपचार सुरु झाल्यानंतर 48 तास ते 72 तासांत मृत्यू होणाऱ्यांचेही प्रमाण खूप आहे. कोरोना हा आजार न लपविता लक्षणे असलेल्यांनी वेळेत उपचार घेतल्यास रुग्ण निश्‍चितपणे त्यातून बरे होऊ शकतात. त्यामुळे लक्षण असलेल्यांनी कोणताही विलंब न लावता वेळेत निदान करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

मृत्यू झालेले रुग्ण (कंसात शहरातील रुग्ण) 
एकूण मृत्यू 
1,919 
24 तासांतील मृत्यू 
292 (159) 
24-48 तासांतील मृत्यू 
116 (58) 
48-72 तासांतील मृत्यू 
129 (61) 

शासकीय रुग्णालयांमधील बेड हाऊसफुल्ल 
शहरातील बॉईज, वाडीया हॉस्पिटल, रेल्वे हॉस्पिटल, सिंहगड, पोलिस प्रशिक्षण केंद्र, शासकीय पॉलिटेक्‍निक कॉलेज याठिकाणीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सोय करण्यात आली आहे. दुसरीकडे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय याठिकाणीही रुग्णांवर उपचार सुरु आहेत. खासगी रुग्णालयांनाही कोरोना रुग्णांसाठी बेड शिल्लक ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बहुतेक शासकीय रुग्णालयांमधील बेड हाऊसफुल्ल झाले असून आणखी बेड वाढविण्याची गरज व्यक्‍त करण्यात येत आहे.

लक्षणे असलेल्यांनी 'अशी' घ्यावी काळजी 

  • कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी; 28 दिवसानंतर दुसरा डोस घ्यावा 
  • मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे अन्‌ स्वच्छता राखावी 
  • लस घेतल्यानंतर मद्यपान करू नये, गर्दीत जाणे टाळावे, दूरचा प्रवास शक्‍यतो करू नये 
  • कोणत्याही व्यक्‍तीशी बोलताना किमान सहा फुटाचे अंतर ठेवून बोलावे 
  • सर्दी, ताप, खोकला असलेल्यांनी वेळेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे 
  • कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:हून कोरोना टेस्ट करून घ्यावी

रुग्णांना चांगले जेवण मिळत नाही 
बॉईज हॉस्पिटल, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय पॉलिटेक्‍निक कॉलेज, वाडीया हॉस्पिटल या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसह त्यांच्या थेट संपर्कातील व्यक्‍तींना ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी महापालिकेने नियुक्‍त केलेल्या मक्‍तेदाराकडून जेवण पुरविले जाते. मात्र, आठवड्यातून काही दिवस निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या तक्रारी त्याठिकाणच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह रुग्णांनी महापालिका प्रशासनाकडे केल्या आहेत. तरीही पुरेसे जेवण मिळत नसून निकृष्ट जेवण देणे बंद झालेले दिसत नाही. या पार्श्‍वभूमीवर आता महापालिका आयुक्‍त, उपायुक्‍त, आरोग्याधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT