31Corona_20akola_2001_1_3.jpg 
सोलापूर

आजार लपवू नका, इलाज करा ! शहराला आज दिलासा; 13 ठिकाणी आढळले 14 रुग्ण

तात्या लांडगे

सोलापूर : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असतानाच सोलापुकरांनी नियमांचे पालन करायला सुरवात केल्याने शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. आज 796 संशयितांमध्ये अवघे 14 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज एकही रुग्ण कोरोनाचा बळी ठरलेला नाही.

ठळक बाबी... 

  • शहरातील एकूण एक लाख 25 हजार 693 संशयितांची कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत दहा हजार 504 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह 
  • आज 796 संशयितांमध्ये 14 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; मृत्यू थांबले 
  • आतापर्यंत नऊ हजार 525 रुग्णांनी केली कोरोनावर मात; आता उरले 412 रुग्ण 

शहरात आज बनशंकरी नगर, मित्र नगर, गावठाण (शेळगी), चाटी गल्ली, वसंत विहार, रजनीगंधा अपार्टमेंट (मोदी), समर्थ नगर (विजयपूर रोड), नरेंद्र नगर (जुळे सोलापूर), गोंडाळे वस्ती, द्वारका विहार (भवानी पेठ), शेटे नगर (लक्ष्मी पेठ), करंजकर सोसायटी आणि शिवस्मारकजवळ (नवी पेठ) या 13 ठिकाणी 14 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी समर्थ नगरातील दोन रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, महापालिकेने आज बालके कोरोनापासून दूर राहावीत म्हणून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यात हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत, मास्क आपलेच असावेत, दोन व्यक्‍तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवावे, आजार लपवू नका, इलाज करा, या नियमांचा समावेश आहे. आपल्याबरोबरच आपले कुटुंब सुरक्षित राहावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही आवाहन महापालिकेने केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: पर्यटकांचा हिरमोड! देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हाणी घाट बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

Pune Property Tax : पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली: पहिल्या तिमाहीत १३९५ कोटी, गेल्या वर्षीपेक्षा १०२ कोटींची वाढ

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

SCROLL FOR NEXT