Solapur News sakal
सोलापूर

Solapur News: घाबरू नका, सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही! दररोज ८०० संशयितांचे टेस्टिंग

परदेशात रुग्ण वाढले तरी, मुंबई व पुणे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे खूपच कमी रुग्ण आहेत. १५ दिवसांत सोलापूर शहर, ग्रामीणमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला. दोघेही बरे झाले असून दहा दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळला नसून सध्या सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : परदेशात रुग्ण वाढत असले तरी, मुंबई व पुणे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे खूपच कमी रुग्ण आहेत. १५ दिवसांत सोलापूर शहर व ग्रामीणमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. दोघेही बरे झाले असून मागील दहा दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळला नसून सध्या सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त आहे.

कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये आरोग्य विभागाची झोप उडविणारे पंढरपूर, बार्शी, मोहोळ, करमाळा, माळशिरस या तालुक्यांसह सोलापूर शहरातील कोरोना आता शांत झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये मृत्युदरात देशातील पहिल्या टॉप-टेन शहरांत सोलापूर होते. त्यावेळी केंद्रीय पथकाने सोलापुरात येऊन शहरातील परिस्थितीची पाहणी केली.

तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कोरोना रुग्ण आढळणाऱ्या परिसरात कडक निर्बंध घातले आणि कोरोना आटोक्यात यायला मदत झाली. त्यानंतर प्रतिबंधित लसीकरण सुरू झाले आणि जिल्ह्यातील ३४ लाखांवर व्यक्तींनी प्रतिबंधित लस टोचून घेतली.

कोविशिल्ड, कोवॅक्सिन, कोर्बोवॅक्स लस उपलब्ध झाली आणि कोरोना आटोक्यात आला. त्यानंतर मृत्युदर देखील कमी झाला आणि कोरोनाच्या रुग्णांमध्ये कोणतेही तीव्र, मध्यम लक्षणे आढळली नाहीत. परंतु, आता जपान, जर्मनी, अमेरिका, चीन व ब्राझीलमध्ये बीएफ-७ व्हेरिएंटचे रुग्ण वाढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. पण, आपल्याकडे तशी घाबरण्यासारखी काहीच परिस्थिती नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

जिल्हाभरात दररोज आठशे टेस्टिंग

परदेशात कोरोना वाढतोय म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यभरात टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट, लसीकरण व कोरोनापूर्वी खबरदारी या पंचसूत्रीवर भर दिला जात आहे. कोरोना वाढू नये म्हणून टेस्टिंगवर भर दिला जात आहे. शहरातील सुमारे तीनशे तर ग्रामीणमधील सहाशे संशयितांची दररोज टेस्टिंग होत आहे.

सर्दी, ताप, खोकला असलेल्यांना आणि रुग्णालयाकडून पाठविलेल्या संशयितांचीच आता टेस्टिंग केली जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे, मागील दहा दिवसांत शहर-ग्रामीणमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. तरीपण, आता दोन डोस घेतलेल्यांना संरक्षित (बूस्टर) डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे. जिल्ह्यासाठी १५ हजार डोस शिल्लक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT