0Dr._Tatyarao_Lahane.jpg 
सोलापूर

तुम्हाला कोरोना होऊ नये वाटतो का? मग या गोष्टी जाणून घ्याच

तात्या लांडगे

सोलापूर : शहरात आतापर्यंत एक लाख 99 हजार 493 तर ग्रामीणमधील पाच लाख 86 हजार 920 संशयितांची कोरोना टेस्ट झाली आहे. त्यामध्ये एकूण 59 हजार 416 जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यात 36 हजार 554 पुरुषांचा तर 22 हजार 862 महिलांचा समावेश आहे. दुसरीकडे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांमध्येही पुरुषच अव्वल असून एक हजार 349 पुरुषांचा तर 576 महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना होऊ नये अथवा कोरोनामुळे मृत्यू होऊ नये म्हणून सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, हाच ठोस उपाय असल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना होऊ नये म्हणून 'अशी' घ्या खबरदारी 

  • कोरोनाचा बळी ठरू नये म्हणून संशयितांनी वेळेत कोरोना टेस्ट करून घ्यावी 
  • वेळेत उपचारासाठी दाखल होऊन घ्यावेत आवश्‍यक ते उपचार 
  • कोरोना होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी 
  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, दूरवरील प्रवास टाळावा 
  • घराबाहेर पडल्यानंतर मास्कचा वापर करावा अन्‌ सोशल डिस्टन्सिंगचे करावे पालन 
  • साबणाने हात स्वच्छ धुवावेत, सॅनिटायझरचाही करावा योग्यवेळी वापर 
  • कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:हून करून घ्यावी कोरोनाची टेस्ट 

शहर-जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनाची साखळी खंडीत करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनखाली आरोग्याधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी संशयितांचे टेस्टिंग वाढविले आहे. दररोज पाच हजारांहून अधिक टेस्ट होऊ लागल्या आहेत. तर शहरातील टेस्टिंगदेखील बाराशेहून अधिक झाले आहे. आज अक्‍कलकोट तालुक्‍यात 14, बार्शीत 72, करमाळ्यात 41, माढ्यात 50, पंढरपूर तालुक्‍यात 43, माळशिरसमध्ये 31, मंगळवेढ्यात सात, मोहोळमध्ये तीन, उत्तर सोलापूर तालुक्‍यात 13, सांगोल्यात दहा आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यात नऊ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे शहरातील चौघांचा तर ग्रामीणमधील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत्यू झालेल्यांपैकी पाचजण 20 मार्चनंतर तर एकजण 13 मार्च रोजी उपचारासाठी दाखल झालेला होता, असेही अहवालातून स्पष्ट होते. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येकांनी नियमांचे पालन केल्यास निश्‍चितपणे कोरोनापासून आपण दूर राहू, असा विश्‍वासही डॉ. लहाने यांनी व्यक्‍त केला आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती... 

  • आतापर्यंत सात लाख 86 हजार 413 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • शहरात आतापर्यंत 15 हजार 205 तर ग्रामीणमध्ये आढळले 44 हजार 211 रुग्ण 
  • एकूण रुग्णांपैकी शहरातील 705 तर ग्रामीणमधील एक हजार 220 रुग्णांचा झाला मृत्यू 
  • आज शहरातील चौघांचा तर ग्रामीणमधील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू; मृत्यू अन्‌ पॉझिटिव्हमध्ये पुरुषच अव्वल 
  • आतापर्यंत 36 हजार 554 पुरुषांना तर 22 हजार 862 महिलांना झाली कोरोनाची लागण 
  • कोरोनामुळे आतापर्यंत एक हजार 349 पुरुषांचा तर 576 महिलांचा झाला मृत्यू 
  • आज शहरात एक हजार 276 संशयितांमध्ये आढळले 176 पॉझिटिव्ह तर ग्रामीणमध्ये पाच हजार 680 संशयितांमध्ये 293 बाधित 
  • उपचारासाठी विलंबाने दाखल झालेल्यांचाच कोरोनामुळे मृत्यू; उपचारासाठी वेळेत दाखल होण्याचे आवाहन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT