1RTE_85.jpg 
सोलापूर

आरटीई प्रवेशासाठी दुप्पट अर्ज ! 'अशी' असेल प्रवेश प्रक्रिया; मे महिन्यात पहिली फेरी

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील 326 शाळांच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या 25 टक्‍के जागांवर दोन हजार 231 विद्यार्थ्यांना आरटीईनुसार सवलतीतून प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून यंदा तब्बल चार हजार 262 जणांचे अर्ज पात्र ठरले आहेत.

शंभर टक्‍के प्रवेश होतील
वंचित आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शासनाच्या सवलतीतून मोठमोठ्या शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावे म्हणून आरटीईअंतर्गत शंभर टक्‍के प्रवेश होतील, असा विश्‍वास आहे. दरवर्षीप्रमाणे शाळाही त्याला सहकार्य करतील. मे ते जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल.
- संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

कोरोनामुळे आरटीईअंतर्गत 25 टक्‍के विद्यार्थ्यांना सवलतीचा प्रवेश देण्याच्या प्रक्रियेत कोरोनामुळे थोडासा बदल करण्यात आला आहे. तत्पूर्वी, संबंधित विद्यार्थ्यास प्रवेश देताना त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी तालुकास्तरीय समितीद्वारे केली जात होती. मात्र, मागील वर्षापासून विद्यार्थ्याचा प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. ही प्रवेश प्रक्रिया 'एनआयसी'तर्फे (राष्ट्रीय माहिती केंद्र) ऑनलाईन लॉटरी पध्दतीने होते. मे महिन्यात प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार असून जूनअखेर प्रवेश प्रक्रिया चालते. गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शहर-जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या नावलौकिक असलेल्या शाळांमधून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने दरवर्षी आरटीईअंतर्गत त्या शाळेतील एकूण प्रवेश क्षमतेच्या 25 टक्‍के जागांवर अशा विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी दिली जाते, असेही शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी सांगितले.

अशी आहे निवड प्रक्रिया

  • अर्ज करताना संबंधित विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या पसंतीने शाळेची निवड करतात
  • घरापासून एक किलोमीटरवरील शाळेत विद्यार्थ्यास प्रवेश देण्यास पहिल्यांदा असते प्राधान्य
  • एक किलोमीटरवरील शाळेतील प्रवेश हाउसफूल्ल झाल्यास पुढील शाळेत प्रवेश देता येतो
  • प्रवेश क्षमतेच्या तुलनेत अर्ज जास्त असल्याने ऑनलाइन लॉटरी पध्दतीने दिला जातो विद्यार्थ्यांना प्रवेश
  • खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपर्यंत अपेक्षित
  • प्रवेशात वशिलेबाजी चालत नाही, चुकीची माहिती अर्जाद्वारे भरल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश ठरविला जातो अपात्र
  • जागा उपलब्ध असताना व विद्यार्थ्याचा प्रवेश निश्‍चित होऊनही शाळेत प्रवेश नाकारल्यास पालकांनी करावी तालुकास्तरीय समितीकडे तक्रार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT