dpdc scheme 6 transformer farmer bjp satish kale solapur sakal
सोलापूर

Solapur News : सहा ट्रान्सफॉर्मर मंजुरीमुळे झाली 200 शेतकऱ्यांची सोय

मोहोळ शहरा जवळील विविध सहा वस्त्यांसाठी साठी "डीपीडीसी" या योजने अंतर्गत सहा ट्रान्सफॉर्मर मंजूर

राजकुमार शहा

मोहोळ : शहरा जवळील विविध सहा वस्त्यांसाठी साठी "डीपीडीसी" या योजने अंतर्गत सहा ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले असून, त्यापैकी एका ट्रान्सफॉर्मर चे काम पूर्ण झाल्याने त्याचे उद्घाटन काळे वस्तीवरील ज्येष्ठ नागरिक ब्रह्मदेव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या सर्व ट्रांन्सफार्मर मुळे सुमारे दोनशे शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे.

या संदर्भात भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सतीश काळे यांनी दिलेल्या माहिती नुसार, शहरा जवळील काळे वस्ती, जाधव वस्ती, कवठे मरकुरी वस्ती, राऊत वस्ती, गायकवाड व सुतार वस्ती, शिंदे वस्ती, कुरडे वस्ती या ठिकाणच्या शेतकऱ्यांना विजेच्या समस्यांना गेल्या अनेक दिवसापासून तोंड द्यावे लागत होते.

ट्रान्सफॉर्मर जळणे, विद्युत पंप जळणे, कमी दाबाने वीज मिळणे या समस्या नित्याच्याच होत्या. अगोदरच्या ट्रांन्सफार्मर वर जादा ताण असल्याने तोही जळत होता. या भागातील शेतकऱ्यांनी नवीन ट्रान्सफॉर्मर ची मागणी काळे यांच्याकडे केली होती. काळे यांनी वरील सहा ट्रांन्सफार्मर चे प्रस्ताव तयार करून महावितरण कडे दाखल केले होते.

दरम्यान राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्फत काळे यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले व सहा ट्रांन्सफार्मर मंजूर झाले. त्यामुळे खंडित वीजपुरवठा व अन्य अडचणी पासून सुमारे 200 शेतकऱ्यांची सुटका झाली. या सहा पैकी काळे वस्तीवरील ट्रान्सफॉर्मर चे काम पूर्ण झाल्याने त्याचे उद्घाटन करण्यात आले.

उर्वरित ट्रांन्सफार्मर चे पोल रवणे, तारा ओढणे, पेट्या बसविणे, हे कामे सुरू आहेत. तीही कामे येत्या महिना भरात पूर्ण होतील असे काळे यांनी सांगितले. या सहा ट्रान्सफॉर्मर साठी पाठपुरावा करून मंजूर करून आणल्या बद्दल वरील वस्तीवरील शेतकऱ्यांनी माजी अध्यक्ष काळे व आमदार सुभाष देशमुख यांचे आभार मानले.

यावेळी धोंडीबा गायकवाड, सुरेश राऊत, सागर देवकर, शाहू धोत्रे, सचिन काळे, किरण देशमुख, बाळू देशमुख, गणेश काळे, योगेश काळे, शितल देशमुख, पांडुरंग कदम, गणेश चव्हाण, सुभाष काळे, संजय काळे, भोलेनाथ काळे, महेश माने, सचिन चव्हाण, युवराज राऊत, समीर काळे, भैय्या माने आदी सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: महाराष्ट्रात पालटू शकतो गेम? आमदार फोडले पण उद्धव ठाकरेंचे खासदार फोडणे शिंदेंसाठी सोपे नाही; Inside Story काय?

Central Railway: कर्मचाऱ्यांचे हाल होणार! मध्य रेल्वेवर 2 दिवस विशेष ब्लॉक, काही लोकल रद्द; वेळापत्रकातही बदल, वाचा सविस्तर

पुण्यात गोळीबाराचा थरार! गुन्हेगाराला पकडायला गेल्यावर अचानक गोळीबार, पोलिसांनीही दिलं प्रत्युत्तर, काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi: वैभव सुर्यवंशीचा जबरदस्त विक्रम अन् टोलेजंग फटकेबाजी पाहिली का? Video जो गोलंदाजांत धडकी भरवतोय..

Latest Marathi News Live Update : गडचिरोली पोटनिवडणुकीत भाजपचे अंकुश नैताम विजयी; काँग्रेसला धक्का

SCROLL FOR NEXT