Dr. Kiran Deshmukh
Dr. Kiran Deshmukh Canva
सोलापूर

"आरटीपीसीआर टेस्ट करणारी ट्रूनेट मशिन धूळखात पडून ! निष्क्रिय आयुक्तांना पदावरून हटवा'

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना (Covid-19) संदर्भातील आरटी-पीसीआरची (Rt-pcr Test) चाचणी करणारी चालू ट्रूनेट मशिन (Trunet Machin) महापालिकेच्या एका दवाखान्यात धूळखात पडून असल्याची तक्रार भाजपचे नगरसेवक डॉ. किरण देशमुख (Dr. Kiran Deshmukh) यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, नगर विकासमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. (Dr. Kiran Deshmukh has Demanded for removal of inactive Municipal Commissioner)

नगरसेवक डॉ. किरण देशमुख म्हणाले, या मशिनद्वारे कोरोनाची आरटी-पीसीआरची चाचणी केली जाते. शहरामध्ये कोरोनाचे अनेक रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असताना वेळेत कोरोना अहवाल मिळाल्यास ही परिस्थितीत आटोक्‍यात येऊ शकते. परंतु, आरटी- पीसीआर करण्याची मशिन शहरामध्ये फक्त सिव्हिल व अश्विनी रुग्णालयामध्ये आहे. शहरातील आरटी- पीसीआरची चाचणी अश्विनीमध्ये तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातील चाचणी केली जाते. महापालिकेच्या चौपाड येथील काळी मशीद नजीकच्या दवाखान्यात अशी मशिन असून, ती वापराविना धूळखात पडून आहे.

शहरातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक टेस्ट करण्यासाठी सामोरे जात आहेत, परंतु त्यांचा रिपोर्ट वेळेत मिळत नाही. काही नागरिकांचे कोरोना रिपोर्ट चार ते आठ दिवस झाले तरीही मिळत नाहीत. कोरोना महामारीच्या अशा कठीण परिस्थितीत चांगल्या अवस्थेतील ही मशिन बंद ठेवण्यामागे आयुक्तांचा उद्देश काय आहे? ही मशिन वापरात आली असती तर कोव्हिड चाचण्या वाढवून तत्काळ रिपोर्ट मिळणे नागरिकांच्या सोयीचे झाले असते. परंतु कोव्हिड उपाययोजनेच्या नावाखाली महापालिका आयुक्त तासन्‌तास वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनामध्ये बैठका घेऊन काय साध्य केले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आज शहरात कोरोना नियोजनाचा बोजवारा उडालेला आहे. नागरिकांना चार ते आठ दिवस उलटले तरी चाचणी अहवाल मिळत नाहीत. त्यामुळे लक्षणे असलेले रुग्ण शहरभर फिरत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे. प्रशासनाच्या अशा निष्क्रिय नियोजनामुळे कोरोना आटोक्‍यात कसा येणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. रिपोर्ट वेळेत न मिळाल्यामुळे बाधित रुग्णाला रुग्णालयांमध्ये प्रवेश मिळणे जिकिरीचे झाले आहे. ट्रेसिंग व टेस्टिंग करण्यावर आयुक्त प्रत्येक बैठकीत आवाहन करतात, परंतु प्रत्यक्षात टेस्ट केलेले रिपोर्टसुद्धा वेळेत मिळत नाहीत.

यापूर्वी देखील महापालिकेकडे पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर मशिनसुद्धा धूळखात पडले होते, तसेच शहरातील कोव्हिड केंद्रांचे फायर ऑडिट तत्काळ करून योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले, परंतु या सर्व बाबींवर उपाययोजना करण्यावर आयुक्त निष्क्रिय ठरले आहेत. या मशिनद्वारे 24 तासात 90 चाचणी अहवाल प्राप्त होऊ शकतात. महापालिकेकडे असलेली ही मशिन वापरात आणल्यास तत्काळ रिपोर्ट मिळण्यास मदत होईल. यामुळे कोरोना आटोक्‍यात आणण्यास मदत होणार आहे. तसेच टेस्टिंगकरिता स्वतंत्र लॅब तयार करून नवीन मशिनची मागणी शासनाकडे केल्यास व ती उपलब्ध झाल्यास शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल. तपासण्या वाढल्यास व अहवाल वेळेत प्राप्त झाल्यास कोरोनावर निश्‍चितच नियंत्रण मिळवण्यात यश येईल, असा विश्वास नगरसेवक डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

सोलापूर शहरातील टेस्टिंग, फायर ऑडिट, व्हेंटिलेटर अशा महत्त्वाच्या गोष्टीत आयुक्तांकडून होणाऱ्या अक्षम्य चुका वेळोवेळी आयुक्तांना निदर्शनास आणून दिल्या; परंतु त्यावर ठोस उपाययोजना करताना आयुक्त दिसून आले नाहीत. या सर्व गंभीर परिस्थितीस महानगरपालिका आयुक्तच जबाबदार आहेत. वरील बाबतीत त्यांच्याकडून झालेल्या अक्षम्य चुकांबाबत महापालिका आयुक्त यांनी स्वतः उत्तरे द्यावीत व कोरोना नियोजनामध्ये अपयशी ठरल्याचे मान्य करावे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आयुक्तांकडून अक्षम्य अशा चुका वारंवार होत असल्याने त्यांना तातडीने आयुक्त पदावरून पायउतार करावे व कर्तव्यदक्ष व सक्षम अधिकाऱ्याची आयुक्तपदावर नेमणूक करण्याकामी आपल्या स्तरावरून संबंधितांना निर्देश व्हावेत, अशी विनंती डॉ. किरण देशमुख यांनी या निवेदनात केली आहे.

महापालिकेच्या बॉईज हॉस्पिटलमध्ये गत महिन्यात व्हेंटिलेटर वापराविना धूळखात पडून असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यावर ती वापरात आली. त्यानंतर आता आरटी-पीसीआर संदर्भातील ट्रूनेट मशिनही धूळखात पडून असल्याचे मी उघडकीस आणले आहे. याला आयुक्तच जबाबदार असून अशा निष्क्रिय व कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आयुक्तांची शासनाने तातडीने बदली करावी.

- डॉ. किरण देशमुख, नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT