Dr Nanasaheb Dharmadhikari Foundation cleanliness Mohol 150 tonnes of garbage remove Sakal
सोलापूर

Solapur News : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने मोहोळ तालुक्यात स्वच्छता मोहीम, 150 टन कचरा उचलला

विविध चौक या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत धर्माधिकारी प्रतिष्ठानचे गावोगावचे सदस्य ही सहभागी झाले

राजकुमार शहा

मोहोळ : डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, मोहोळ तालुक्यातील विविध ग्रामपंचायती, नगरपरिषद, सेवाभावी संस्था व विविध राजकीय पक्ष यांच्या वतीने रविवार ता एक ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या माध्यमातून ओला व सुका असा मिळून सुमारे दीडशे टन कचरा उचलण्यात आल्याची माहिती भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर यांनी दिली.

सोमवार ता 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात येते. त्या निमित्त प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील गावोगाव ची विविध देवतांची मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्र, मस्जिद, दर्गे, पशुवैद्यकीय दवाखाने, ग्रामपंचायत कार्यालये, साखर कारखाने परिसर, गावांतर्गत रस्ते,

विविध चौक या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत धर्माधिकारी प्रतिष्ठानचे गावोगावचे सदस्य ही सहभागी झाले होते, तर भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, आधी सह अन्य पक्षांचे पदाधिकारी ही सहभागी झाले होते. डम्पिंग ट्रॅक्टर, खोऱ्या, पाटी, झाडू व टिकाव हे साहित्य घेऊन सकाळी साडेनऊ वाजता स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली होती.

यात प्रामुख्याने त्या त्या गावचे सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामसेवक यांच्यासह शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख चरण चवरे, रमेश माने, सुशील क्षीरसागर,विजयराज डोंगरे, विष्णुपंत चव्हाण, सुनील चव्हाण रणजीत चवरे, रामदास चवरे, संजय वाघमोडे, विकास वाघमारे, आदि सह अन्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

आजचे राशिभविष्य - 17 मे 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2026

New Marathi Books Review : वाचनीय आणि संग्रहणीय! अध्यात्मापासून ते पर्यटनाच्या अनुभूतीपर्यंत, नव्या पुस्तकांची रंजक सफर

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ मे २०२६ ते २३ मे २०२६)

SCROLL FOR NEXT