Dr Neelam Gorhe say Use the time when temples are closed to provide better facilities to devotees Dr Neelam Gorhe 
सोलापूर

मंदिरे बंद असण्याच्या काळाचा भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी उपयोग करा : डॉ. नीलम गोऱ्हे 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी मंदिरे बंद असण्याच्या कालावधीचा उपयोग करा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुरातत्व विभाग व प्रशासनास दिले. 
पुरातत्व विभाग, श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर (पंढरपूर), श्री एकवीरा देवी (कार्ला), श्री लेण्याद्री (जुन्नर), श्री खंडोबा देवस्थान (जेजुरी) यांच्या विकास कामांचा आढावा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. या वेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी केंद्र शासनाचे पुरातत्त्व विभागाचे अधिक्षक डॉ. राजेंद्र यादव, महाराष्ट्र पुरातत्व विभागाचे संचालक श्री. गर्ग, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी, मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे, जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक श्री. वाहने, आर्किटेक प्रदीप देशपांडे व आर्किटेक तेजस्विनी आफळे उपस्थित होते. 
सप्टेंबर 2019 मधील बैठकीमधील निर्देशानुसार विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर देवस्थान समितीने सविस्तर विकास आराखडा तयार करण्यासाठी आर्किटेक नेमला आहे व त्याला बारा लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. नोव्हेंबर 2020 अखेर सदर विकास आराखड्याचे काम पूर्ण होईल, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. जोशी यांनी सांगितले. 
यावेळी आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी आळंदी या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तीर्थक्षेत्र विकास आराखडा 80 टक्के पूर्ण झालेली असून भूसंपादनासाठी साडेतीन कोटी रुपये आवश्‍यक आहेत. पुणे महापालिकेने आळंदी शहरासाठी दहा एमएलडी पाणी देण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगितले. 
यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आळंदी शहरांमधील घनकचरा व्यवस्थापन संदर्भात योग्य प्रकारे नियोजन करावे. सर्व भाविकांना आवश्‍यक असणाऱ्या सुविधा पुरवाव्यात, असे सूचित केले. तसेच आळंदीतील शासनाच्या विश्रांती गृहाचे विस्तारीकरण करण्यासंदर्भात संबंधित विभागास मुख्याधिकारी यांनी लेखी कळवावे, असे सांगितले. 

गर्भगृहात हवा खेळती ठेवा 
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विठ्ठल मंदीरातील गर्भगृह व ज्या ठिकाणी लोकांची गर्दी असते त्या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी उपाययोजनाचा समावेश या डीपीमध्ये करावा व नैसर्गिक प्रकाशासाठी आवश्‍यक उपाययोजना आराखड्यात समाविष्ट कराव्यात, असे निर्देश दिले. मंदिरामध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्यासंदर्भात डीपीआरमध्ये तरतूद करावी, असेही निर्देश दिले. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! पहिल्या पतीला सोडून २८ वर्षीय विवाहिता ४४ वर्षांच्या दुसऱ्यासोबत राहिली, त्याने दारुच्या नशेत केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, नातेवाईकांच्या संशयानंतर उलगडली कहाणी

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

Video Viral: बेडवर झोपलेल्या रुग्णाला डॉक्टरने केली बेदम मारहाण; घटनेचं कारण आलं समोर

शेतकऱ्यांना आता कर्जासाठी घरबसल्या करता येणार अर्ज! ‘या’ पोर्टलवर अर्ज केल्यावर 2 दिवसांत बॅंकांकडून मिळेल पीककर्ज, सोलापुरात शासनाचा पायलट प्रोजेक्ट

SCROLL FOR NEXT