Dr. Yadav Canva
सोलापूर

शिवाजी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. यादव यांची फेरनिवड !

शिवाजी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. यादव यांची फेरनिवड ! उपाध्यक्षपदी नंदन जगदाळे

प्रशांत काळे

कर्मवीर जगदाळे मामांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती केली असून 40 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी संस्थेच्या विविध शाखेत शिक्षण घेत आहेत तर तीन हजारपेक्षा जास्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संस्थेत कार्यरत आहेत.

बार्शी (सोलापूर) : शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सोलापूर व उस्मानाबाद जिल्हा कार्यक्षेत्रातील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या (Shri Shivaji Shikshan Prasarak Mandal) गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत डॉ. बी. वाय. यादव (Dr. B. Y. Yadav) यांची अध्यक्षपदी, नंदन जगदाळे यांची उपाध्यक्षपदी, पी. टी. पाटील जनरल सेक्रेटरी, अरुण देबडवार सहसचिवपदी तर जयकुमार शितोळे यांची खजिनदारपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. (Dr. Yadav elected as the Chairman of the Shivaji Shikshan Prasarak Mandal)

विश्वस्त मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक रविवारी पार पडली होती. यात सात जागा बिनविरोध झाल्या होत्या तर आठ जागांसाठी निवडणूक लागली होती. निवडणुकीत डॉ. प्रकाश बुरगुटे यांचा पराभव झाला होता. नूतन पदाधिकारी निवडीसाठी संचालकांच्या बैठकीत नूतन सदस्यांच्या निवडी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भागवत चव्हाण यांनी जाहीर केले. डॉ. बी. वाय. यादव, डॉ. गुलाबराव पाटील, तानाजी शिनगारे, राजेंद्र पवार, डॉ. विलास देशमुख, विष्णू पाटील, दिलीप रेवडकर, सुरेश पाटील, प्रकाश पाटील, नंदकुमार जगदाळे, शशिकांत पवार, अरुण देबडवार, जयकुमार शितोळे, सोपान मोरे, दिलीप मोहिते हे संचालक म्हणून निवडून आले होते. जनरल सेक्रेटरी झालेले पी. टी. पाटील हे जलसंपदा खात्यातील सेवानिवृत्त उपअभियंता असून जगदाळे मामांचे गाव असलेल्या चारे येथील जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते संजय पाटील यांचे बंधू आहेत. त्यांचे वडील टी. एन. पाटील चाळीस वर्षे संस्थेचे उपाध्यक्ष होते. पहिल्यांदाच चारे गावाला कर्मवीर जगदाळे मामांच्या (Karmveer Jagdalemama) नंतर हे पद मिळाले आहे.

अध्यक्षपद मानाचे !

कर्मवीर जगदाळे मामांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती केली असून 40 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी संस्थेच्या विविध शाखेत शिक्षण घेत आहेत तर तीन हजारपेक्षा जास्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संस्थेत कार्यरत आहेत. संस्थेचे 300 बेडचे जगदाळेमामा हॉस्पिटल व ट्रॉमा युनिट कार्यरत आहे. त्यामुळे संस्थेच्या अध्यक्षपदास अनन्यसाधारण महत्त्व आहे. बार्शी शहर व तालुक्‍यात हे मानाचे पद म्हणून ओळखले जाते. डॉ. बी. वाय. यादव 1986 पासून अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 3rd ODI: डॅरिल मिशेल टीम इंडियासाठी ठरतोय डोकेदुखी, सलग दुसरं शतक झळकावत घडवला इतिहास

"लोक मला उत्तर भारतीय समजतात पण मी मराठी मुलगा" हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्याची कबुली; म्हणाला..

Sakal Drawing Competition 2026 : रंगरेषांच्या दुनियेत हरवले विद्यार्थी; घोडेगावात सकाळ चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Mumbai Water Supply: मुंबईकरांवर ४४ तासांची पाणीकपात! २० ते २२ जानेवारीला पाणी संकट; कोणत्या भागांवर परिणाम?

19 Minute 34 Second Viral Video पासून ते अक्षय खन्नाच्या FA9LA डान्सपर्यंत..गेल्या वर्षी तूफान व्हायरल झाल्या 'या' 10 गोष्टी

SCROLL FOR NEXT