Kadba 
सोलापूर

मुबलक हिरवा चारा उपलब्ध झाल्याने पशुपालक खूष ! मात्र कडब्याचे दर गडगडल्याने शेतकरी व व्यापारी त्रस्त

नानासाहेब पठाडे

पोथरे (सोलापूर) : यावर्षी शेतीसाठी निसर्गाची साथ चांगलीच मिळाली आहे. सततच्या पावसाने पिके जोमात असून सर्वत्र हिरवळ पसरली आहे. असे असले तरी, शेतकऱ्याच्या शेतातील कडब्याचे (वैरण) भाव मात्र गडगडले आहेत. विशेषतः लॉकडाउनमुळे जनावरांचे बाजार बंद असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांच्या उलाढाली बंद झाल्याने कडब्याची मागणी थांबली आहे. 

यावर्षी जून महिन्यापासूनच दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या बांधावर, शेतात, मोकळ्या रानात, मुबलक प्रमाणात गवत वाढले आहे. सध्या जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था याच गवतावर होत असल्याने कडब्याचा वापर अत्यल्प होत आहे. अशातच जनावरांची खरेदी-विक्री बंद असल्याने कडब्याची मागणीही पूर्णपणे थांबलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कडबा शिल्लक आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस असूनही अनेक शेतकऱ्यांनी बाजार सुरू नसल्याने नवीन जनावरांची खरेदी केली नाही. त्यामुळे कडबा खरेदीसाठी स्कोप निर्माण झाला नाही. 

सध्याच्या स्थितीत कडब्याला 800 ते 900 रुपये शेकडा बाजारभाव आहे. हिरवी मका पण दीड ते दोन रुपये किलोने विक्री केली जात आहे. मात्र मागणीच नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी मका बांधावरच टाकलेली आहे. याशिवाय आता लवकरच कारखाने सुरू होणार असल्याने उसाचे वहाडेही मिळणार आहेत. वहाडे संपेपर्यंत या वर्षीचा नवीन कडबा बाजारात येणार आहे. त्यामुळे कडब्याला मागणी होणार नाही, असे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे निसर्गाने इतर पिकांना मोठे जीवदान दिले असले तरी कडब्याला मात्र मागणी नसल्याने शेतकरी व विक्रेते दोघेही तोट्यात गेलेले आहेत. 

याबाबत करमाळा येथील कडबा आडत व्यापारी ईश्‍वर कसाब म्हणाले, जनावरांचे व्यापार बंद असल्याने व मध्यंतरी दुधाचे बाजारही ढासळले. त्यामुळे दुभत्या जनावरांची खरेदी झाली नाही. शिवाय यावर्षी हिरवा चाराही मुबलक उपलब्ध झाल्याने कडब्याला मागणीच नाही. त्यामुळे आमच्या व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. 

पोथरे येथील शेतकरी गंगाधर शिंदे म्हणाले, माझ्याकडे सात हजार कडबा आहे. परंतु बाजार नसल्याने कडबा तसाच शिल्लक आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT