Gram_panchayat_election 
सोलापूर

हटवादी धोरणामुळे पानगावात अडतेय बिनविरोधचे घोडे ! निवडणूक पुढे ढकलल्याने आहे अजूनही संधी

संतोष कानगुडे

पानगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात चालू ग्रामपंचायत निवडणूक हंगामात बहुतांश गावांमधील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या असून, काही गावांत ठराविक प्रभाग बिनविरोध झाले आहेत. अशा परस्थितीत तालुक्‍यात बिनविरोधाचे वातावरण असताना, विविध पुरस्कार प्राप्त पानगाव ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे स्वप्न मात्र काही मोजक्‍या गावपुढाऱ्यांच्या हटवादी धोरणामुळे पूर्ण होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सदोष प्रभाग रचनेमुळे चालू निवडणूक कार्यक्रमातून पानगाव ग्रामपंचायत निवडणूक वगळण्यात आली असून, ती पुढे ढकलली आहे. आगामी काळात ती बिनविरोध करण्याची अजूनही नामी संधी ग्रामस्थांना आहे. 

तालुका तसेच जिल्हा स्तरावर शिक्षण, तंटामुक्ती, शांतता, उपक्रमशीलता, आरोग्य आदीबाबतीत लौकिक असलेले गाव म्हणून पानगावकडे पहिले जाते. या पार्श्वभूमीवर मागील निवडणुकांमधून आलेले कटू अनुभव पाहता, आगामी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थ इच्छुक आहेत. परंतु, काही गावपुढारी सत्ता आणि पद या दोन्हींच्या मोहामुळे या बिनविरोध प्रस्तावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तीन ते चार वेळेस कामाची संधी दिल्यानंतर अजूनही मलाच संधी मिळावी, अशी अपेक्षा ठेवून पुढारी काम करत असून, ते गावाचा विकास करू शकत नाहीत, असे जाणकारांचे मत आहे. 

वास्तविक पाहता, ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यास निवडणुकीवर होणारा खर्च तर टाळता येणार आहे, तसेच गावात बंधुभावही जपला जाणार असून, बिनविरोधनंतर गावाच्या विकासासाठी मोठा निधी देण्याचे आश्वासन देखील लोकप्रतिनिधींनी दिले आहे. असे असताना, गावपुढारी मात्र बिनविरोधाची चर्चा करायला तयार नाहीत, हे आश्‍चर्यच म्हणावे लागेल. 

बिनविरोधला ठरताहेत हे अडसर 

  • मागचा पराभव भरून काढू, असे म्हणून काही निवडक कार्यकर्ते गावपुढाऱ्यांना बिनविरोधची चर्चा करू देत नाहीत 
  • निवडणुकीत विरोध दाखवायचा आणि त्यानंतर पडद्याआड वाटाघाटी करायच्या अशांना बिनविरोध निवडणूक नको आहे 
  • यावेळी सुशिक्षित, विकासात्मक दृष्टिकोन असलेले नवे चेहरे ग्रामस्थांना अपेक्षित आहेत, हे काहींना पटत नाही 
  • अमुक भागाचा एक सदस्य लागतोच, असा काहींचा हटवादीपणा बिनविरोध निवडणुकीची चर्चा होऊ देत नाही 
  • गाव विकासापेक्षा पद मोठे, असे काही निर्बुद्धांचे मत आहे 
  • सत्ता माझ्या हातात राहावी, असे स्वप्न पाहणाऱ्या निवडक प्रवृत्तींमुळे बिनविरोधला अडचणी येत आहेत 
  • कोणी कोणाचे नेतृत्व मान्य करायला तयार नाहीत, त्यामुळे चर्चा कोणी घडवायची, हा देखील महत्त्वाचा अडसर आहे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT