Damage Onion 
सोलापूर

पावसाच्या तडाख्याने कांद्याचा झाला रेंदा ! उत्तर तालुक्‍यात खरीप पिकांना फटका

दयानंद कुंभार

वडाळा (सोलापूर) : उत्तर सोलापूर तालुक्‍यात शेतकऱ्यांचा भरवशाचा असणारा खरीप हंगाम. मात्र यंदा सततच्या पावसाने उडीद व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जून महिन्यात पावसाला सुरवात झाली की उत्तर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी कांदा रोपवाटिका तयार केल्या. ऑगस्ट महिन्यापासून कांदा लागवड सुरू झाली. पण वाफसा होण्याआधीच सततच्या पावसाच्या कोसळणाऱ्या धो-धो सरींमुळे कांदा जागेवरच कोलमडून पडत आहे. 

सध्या पुढे कांदा लागवड तर मागे पावसाने भुईसपाट म्हणजे "पुढचे पाठ मागे सपाट' या उक्तीप्रमाणे कांदा उत्पादकांची अवस्था झाली आहे. यामध्ये महागडे बियाणे, कांदा रोपवाटिकेचा खर्च व लागवडीच्या भरमसाठ मजुरीमुळे शेतकरी तोट्यात आला आहे. उत्तर तालुक्‍यातील वडाळा, नान्नज, रानमसले, पडसाळी, कळमण, कौठाळी, गावडी दारफाळ, मार्डी, अकोलेकाटी, बीबीदारफळ, कोंडी, कारंबा परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. 
गतवर्षी कांदा उत्पादनातून मिळवलेले चार पैसे यंदा कांद्यातच वाया गेले, अशी अवस्था कांदा उत्पादकांची झाली आहे. 

तसेच काढणीला आलेल्या उडीद पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानग्रस्त खरीप हंगामातील पिकांचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

याबाबत रानमसले येथील शेतकरी रमेश पाटील म्हणाले, कांद्याचे महाग बियाणे खरेदी करून सध्या कांदा लागवड केली; मात्र पावसाच्या तडाख्याने कांदा पीक वाहून गेले तर उरलेली लागवड जागेवरच कांदा पात पिवळी पडून कांदा लागवड सडत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT