Swami Samarth 
सोलापूर

कोरोनामुळे अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्रावणातील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द 

चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : हिंदू धर्मातील सर्वांत पवित्र अशा श्रावण मासास आज आरंभ झाला आहे. या श्रावण मासात येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिर समितीकडून करण्यात येत असत. परंतु, यंदा या श्रावण मासाच्या तोंडावरही कोरोनाचे थैमान सुरूच आहे. दरवर्षी श्रावण मासात वटवृक्ष मंदिरात आयोजित करण्यात येणारे कथा, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रावण मासात रंगणाऱ्या भक्ती आनंदावर यंदा कोरोनाचे विरजण पडले आहे. 

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाउनमुळे मंदिर बंद असल्याने श्रावण मासात वटवृक्ष मंदिरात आयोजित करण्यात येणारे सर्व धार्मिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आल्याची माहिती वटवृक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. श्री. इंगळे म्हणाले, हिंदू धर्म संस्कृतीत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण मासास विशेष असे महत्त्व आहे. या श्रावण मासात भाविक भगवान शंकराची नियमित आराधना व पूजा करतात. श्री स्वामी समर्थांनी देखील "शिव हर शंकर, नमामी शंकर, शिवशंकर शंभू, हे गिरीजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभू' या श्‍लोकातून भगवान शंकराची आराधना केली आहे. भगवान शंकराचा आत्मिक सहवासही स्वामींना लाभला आहे. श्री वटवृक्ष मंदिरातील स्वामींची मूर्तीही शिवपिंडीवरच नियमित विराजमान आहे. या पार्श्वभूमीवर श्रावण मासातील प्रतिसोमवारी उपवासाप्रीत्यर्थ सायंकाळी 5.30 वाजता नैवेद्य, आरती संपन्न होत असते. त्यामुळे वटवृक्ष मंदिरातील श्रावण मासातील नित्यक्रम व धार्मिक कार्यक्रमांना विशेष असे आध्यात्मिक महत्त्व आहे. 

श्रावण मासात येणारा नागपंचमी हा महिला माता, भगिनींचा सर्वांत मोठा व आनंद देणारा सण. या सणाला अनेक माता भगिनी वटवृक्ष मंदिरात एकत्र येऊन हा सण साजरा करीत असत. श्रावण शुद्ध प्रतिपदा ते श्रावण अमावस्याअखेर कथा, कीर्तन, प्रवचन सप्ताह तसेच मुरलीधर मंदिरात गोकुळ अष्टमी व गोपाळ काल्याचे कीर्तन सप्ताह संपन्न होत असत. परंतु यंदा कोरोनामुळे सर्व भाविक या कार्यक्रमांच्या माध्यमातून लाभणाऱ्या भक्ती आनंदापासून वंचित राहणार आहेत. "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' या श्री स्वामी समर्थांच्या ब्रीदवाक्‍याप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज सर्वांच्या पाठीशी आहेतच. यंदाच्या श्रावण महिन्यात प्रत्येक स्वामीभक्ताने आपल्या घरी थांबून स्वामींची आराधना करावी, असे आवाहन श्री. इंगळे यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood : नेपाळमध्ये पुण्याचे ४ पर्यटक अडकले, टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीने वाऱ्यावर सोडले; तरुणीची सरकारला मदतीसाठी आर्त हाक

Stock Market IPO: 300 रुपयांचा शेअर थेट 634 रुपयांवर! पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट, गुंतवणूकदार मालामाल

Lunar Eclipse 2026 Do's & Don'ts: चंद्रग्रहणाच्या काळात चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी; मन शांत ठेवण्यासाठी ठरेल महत्त्वाचे

Marathi News Live Updates : MPSC पेपरफुटी प्रकरणाचा तपास वेगात; मुंबई पोलिसांचे पथक नंदुरबारमध्ये दाखल

विशेष मुलांसोबत ‘सन मराठी’च्या कलाकारांची राखीपौर्णिमा; योगिता चव्हाणच्या शब्दांनी जिंकलं मन

SCROLL FOR NEXT