Vegetables 
सोलापूर

कोथिंबीर कडाडली ! इतर भाजीपाल्यांचे दरही वाढले दुपटीने 

राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : मध्यंतरी झालेल्या परतीच्या पावसामुळे कोथिंबीर मोठ्या प्रमाणावर खराब (नासली) झाली. त्यामुळे बाजारपेठेत कोथिंबिरीची आवक कमी होत आहे. सध्या कोथिंबिरीला मागणी वाढल्याने एक जुडी 25 ते 30 रुपये दराने विक्री होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्यानेही कोथिंबिरीचे दर वाढले आहेत. हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहेत. 

मध्यंतरी पावसाने शेतात असलेली कोथिंबीर सडून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी आवक कमी होत आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. आता नवीन कोथिंबीर येण्यास 20 ते 22 दिवस लागतील. तोपर्यंत ग्राहकांना जादा दरानेच कोथिंबीर खरेदी करावी लागणार आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या सात-आठ महिन्यांपासून बंद असलेली हॉटेल्स, उपाहारगृहे नुकतीच चालू झाली आहेत. त्यामुळे कोथिंबिरीचे दर यापुढेही कडकच राहण्याचे संकेत मिळत आहेत. कोथिंबीर कडाडली असतानाच इतर भाजीपाल्यांचे दरही दुपटीहून जास्त झाल्याचे दिसून येत आहे. 

भाजीपाल्यांचे दर (प्रतिकिलो) पूर्वीचे - आताचे दर 

  • गवार : 30 - 80 
  • टोमॅटो : 30 - 50 
  • वांगी : 20 - 40 
  • कांदा : 20 - 60 
  • कारली : 20 - 50 
  • हिरवी मिरची : 30 - 30 
  • काकडी : 20 - 40 
  • बटाटा : 30 - 50 
  • दोडका : 40 - 40 
  • शेवगा : 30 - 60 
  • घेवडा : 30 - 50 
  • वाटाणा : 30 - 50 
  • मेथी (पेंढी) : 10 - 20 
  • पालक (पेंढी) : 10 - 20 
  • चुका (पेंढी) : 10 - 20 

भाजीपाला विक्रेता अजिज शेख म्हणाले, मध्यंतरी सलग काही दिवस परतीचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील उभा भाजीपाला व पिके सडून व नासून गेली. त्यामुळे कांदा, बटाटे, टोमॅटो आदींचे भाव वाढले आहेत. 

केत्तूर येथील गृहिणी उज्ज्वला निंभोरे म्हणाल्या, घरगुती भाज्या टेस्टी, चवदार होण्यासाठी कोथिंबिरीचा वापर आवर्जून केला जातो. परंतु कोथिंबिरीची एक जुडी 25 रुपयाला झाल्याने आता मात्र हात आखडता घ्यावा लागत आहे. 

ग्राहक गणेश शेंडगे म्हणाले, ग्रामीण भागात आठवडा बाजार बंद असल्याने भाजी विक्रेते म्हणेल त्या भावात भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT