Ropale 
सोलापूर

वाढत्या अपघातांमुळे रोपळे येथील रेल्वे पुलाखालील पाण्यात पणत्या लावून प्रशासनाचे वेधले लक्ष !

मोहन काळे

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : रोपळे (ता. पंढरपूर) येथील रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहात असल्यामुळे पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. पुलाखालून चालण्यासाठी भोसे - रोपळे हा प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे आज दिवाळीच्या सुरवातीलाच ग्रामस्थांनी या रेल्वे पुलाखालच्या पाण्यात पणत्या सोडून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

भोसे- पेनूर या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 81 वरील रोपळे गावाजवळील रेल्वेच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे तब्बल तीन महिरन्यांपासून हा रस्ता पादचाऱ्यांसाठी बंद झाला आहे. त्यामुळे रोजच्या या त्रासाला कंटाळलेल्या प्रवाशांनी आज रेल्वे पुलाखालच्या पाण्यातच पेटत्या पणत्या लावून रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केला. 

या रेल्वे पुलाखाली पाणी साचून राहत असल्याने रेल्वे पुलाखालच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे हा रस्ता आता धोकादायक बनला आहे. पाण्यातील खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे या रेल्वे पुलाखाली दररोज होणाऱ्या अपघातांची संख्या वाढू लागली आहे. रेल्वे प्रशासनाने येथील गेट बंद करून पूल उभारला. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूला भिंती बांधल्या नसल्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहून गेल्यामुळे मोरी तुंबली आहे. याची देखभाल होत नसल्यामुळे रेल्वे पुलाखालच्या रस्त्यावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. तर सतत या पाण्यातून ये - जा करावी लागत असल्यामुळे मोटारसायकलींसह इतर वाहनांच्या मेंटेनन्स खर्चात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे वैतागलेल्या प्रवासी व ग्रामस्थांनी आज या पाण्यात पणत्या लावून प्रशासनाचे लक्ष वेधले. 

यांचा होता सहभाग 
या रेल्वे पुलाखाली पाणी साचून राहिले की सामाजिक बांधिलकी म्हणून वसंत आदमिले, बाळासाहेब पवार, सोमनाथ आदमिले व त्यांचे इतर साथीदार तुंबलेली गटार साफ करून पाणी काढून देत असतात. दरम्यान, आज दिवाळीच्या पहिल्याच रात्री नागनाथ माळी, विलास चव्हाण, किशोर महामुनी, नवनाथ माने, नारायण बंडगर, परशुराम मोरे, शिवाजी व्यवहारे, दत्तात्रय बिस्किटे आदी ग्रामस्थांनी रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यात पणत्या लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

रोजच अनेक वेळा रेल्वे पुलाखालच्या पाण्यातून ये - जा करावी लागत असल्यामुळे आमच्या गाड्यांच्या चाकांना गंज लागून मोठे नुकसान झाले आहे. 
- नागनाथ माने, वाहनधारक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT