mirchi.jpg 
सोलापूर

हाताशी आलेल्या मिरचीच्या पिकाला बाजारपेठ मिळत नसल्याने उत्पादक झाले हतबल

शांतीलाल काशीद

मळेगाव(सोलापूर)ः लॉकडाउनमध्ये शेतीमालाच्या बाजारपेठा बंद असल्याने येथील मिरची उत्पादक शेतकरी गौस बशीर शेख यांचे मिरचीचे उत्पादन संकटात सापडले आहे. कांद्याच्या पाठोपाठ त्यांचे मिरचीचे उत्पादन देखील नुकसानीत गेले आहे. 

लॉकडाउन सुरु झाल्याने बाजारपेठा व सौदे बंद असल्याने ग्राहक व व्यापाऱ्यांनी शेतमालाकडे पाठ फिरवली. तसेच शेतात कामासाठी शेतमजूर नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी लॉकडाउनच्या चक्रव्यूहात पुरता अडकला आहे. 

येथील मिरची उत्पादक शेतकरी गौस बशीर शेख मिरच्यांचे भाव गडगडल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. या अगोदर शेख यांनी दोन एकर पिकवलेला कांदा भावाआभावी शेतातच सडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले होते. आता हातातोंडाशी आलेले मिरचीचे उत्पादन कोठे विकावे असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. 
मळेगाव येथील गौस शेख यांनी एक एकर शेतात मिरचीची लागवड केली. रोप लागवड, फवारणी, ड्रीप यासाठी त्यांना 60 हजार रुपये इतका खर्च आला. बहरात आलेली मिरची मागणीअभावी व मजुराअभावी शेतातच पडून राहत असल्याने त्यांचे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. लातूर, हैद्राबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद, पुणे येथे मार्केट बंद असल्याने व मागणी नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनकाळात द्राक्ष, केळी, दोडका, कलिंगड, खरबूज, काकडी यासारख्या अनेक पिकांना भाव नसल्याने बळीराजाने मोठं आर्थिक नुकसान सहन केले आहे. 

मिरचीचे उत्पादन नुकसानीत 
लॉकडाउनचा फटका मिरची,दोडका यासारख्या अन्य पिकांना बसला आहे.त्यामुळे शासनाने झालेली नुकसानभरपाई द्यावी. 
- गौस शेख, शेतकरी मळेगाव 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

Viral Indian Wedding Funny Moment : या नवरदेवानं तर हद्दच केली! लग्नात 'चमकायच्या' नादात अंगालाच गुंडाळली लाईटिंग; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Shani Gochar 2026: 21 मार्चपासून शनि नक्षत्र गोचर! ‘या’ 3 राशींचा सुरू होणार गोल्डन टाईम

IPL 2026 Tickets: मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स अन् RCB सह सर्व संघांची तिकिटं कुठे खरेदी करता येणार? किंमत किती असणार?

Equestrian Statue: बीबीदारफळमध्ये मध्यरात्रीच उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा; हटविण्यास ग्रामस्थांचा विरोध, पाेलिसांशी वादावादी!

SCROLL FOR NEXT