Kettur 
सोलापूर

नवरात्रोत्सवामुळे घराघरांत सुरू झाली शूचिर्भूतता मोहीम ! महिलांबरोबरच पुरुष व बच्चेकंपनीही सहभागी 

राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : नवरात्रोत्सव चार-पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने घरोघरी स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. घराच्या स्वच्छतेबरोबरच घरातील कपडे, कापडी साहित्य, भांडीकुंडी यांची साफसफाई केली जात आहे. जवळच असणाऱ्या उजनी परिसर, विहिरी तसेच पाझर तलावाच्या ठिकाणी महिला मंडळींबरोबरच पुरुष व बच्चेकंपनींची कपडे धुण्यासाठी गर्दी होत आहे. पाण्याचा हा परिसर सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत रंगीबेरंगी अंथरूण-पांघरूण तसेच विविध कपड्यांनी रंगून जात आहे. 

भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्री व दसऱ्याच्या सणाला महत्त्वाचे स्थान आहे. नवीन कार्याच्या शुभारंभासाठीही हा दिवस शुभ समजला जातो. त्यामुळे "दसरा सण मोठा नाही, आनंदाला तोटा' असे म्हटले जाते. शनिवार, 17 ऑक्‍टोबर रोजीच्या घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाला सुरवात होणार आहे. त्यानंतर नऊ दिवसांनी दसरा सीमोल्लंघन कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाची सांगता होते. या नवरात्रीच्या काळामध्ये देवीची मनोभावे पूजा केली जाते. घरोघरी घटस्थापना केली जाते. घरोघरी त्याची जोरदार तयारी सुरू आहे. काही घरांना रंगरंगोटीही केली जात आहे. 

कोरोना संसर्गाच्या लॉकडाउनमुळे अद्यापही शाळा, कॉलेजेस सुरू झाले नसल्याने घरातील मुले - मुलीही सध्या घरातच बसून आहेत. त्यामुळे ही सर्व कंपनी घरगुती कामामध्ये घरच्यांना मदत करताना दिसत आहे. उजनी लाभक्षेत्र परिसरात कपडे मोठ्या प्रमाणात धुतले व वाळवले जात असल्याने पाणथळ ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. या काळामध्ये अनेक महिलांना धुणीभांडी करण्यासाठी रोजगारही मिळतो. धुणीभांडी करण्यासाठी महिला दिवसाला 350 ते 400 रुपये मजुरी घेत आहेत. 

याबाबत केत्तूरच्या लक्ष्मी विघ्ने म्हणाल्या, प्राचीन परंपरा असल्याने घरातील सर्व कपडे नवरात्री अगोदर पूर्णपणे धुतले जातात. घर शूचिर्भूत केले जाते. 

केत्तूर येथील विद्यार्थी आकाश इरावडे म्हणाला, कोरोना संसर्गामुळे शाळेला सुटी असल्याने घरच्यांना मदत म्हणून धुण्यासाठी उजनी जलाशयाकाठी जात आहे. शाळांना सुटी असल्यामुळे घरच्यांना कामात हातभार लावत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT