Kandar 
सोलापूर

महावितरणाचा भोंगळ कारभार ! ऐन उन्हाळ्यात संपूर्ण कंदर गाव चाचपडतोय अंधारात

पांडुरंग भगत

कंदर (सोलापूर) : महावितरण अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे कंदरसह (ता. करमाळा) परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मागील चार - पाच दिवसांपासून निम्मे गाव अंधारात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. तर उर्वरित असणारे रोहित्रही रविवारी (ता. 14) रात्री जळाल्याने पूर्ण गाव अंधारात सापडला आहे. यामुळे महावितरण विभागाच्या विरोधात नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीही पसरली आहे. 

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे आहे. पण महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे वीज वारंवार खंडित होत असल्याचे प्रकार घडत आहेत. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घडत असलेला प्रकार त्वरित न थांबवल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

वीज वारंवार बंद होत असल्याने नागरिकांना विद्युत उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत. पिण्याचे पाणी मिळणेही मुश्‍कील झाले आहे. तसेच वेगवेगळे उद्योग असणाऱ्या दुकानदार व व्यावसायिकांचीही अडचण झाली आहे. एकूणच, सर्व कामकाजावर विपरीत परिणाम होत आहेत. अशा गंभीर मुद्‌द्‌याकडे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

मागील काही महिन्यांपासून गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकांसमोर मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. आमच्या उद्योगावर परिणाम होत आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिक व व्यावसायिकांना त्रासास सामोरे जावे लागत असल्याने महावितरणने ही समस्या सोडवणे गरजेचे आहे. 
- सूर्यकांत झिंगाडे, 
व्यावसायिक 

चांगचे अधिकारी देण्याची मागणी 
उपकेंद्रातील कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे हे उपकेंद्र समस्यांचे माहेरघर बनले आहे. प्रभारी अधिकाऱ्यावर कामकाज सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी या गावाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. त्वरित गावातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT