Construction 
सोलापूर

"घर पाहावे बांधून'चे स्वप्न भंगतेय ! वाळूटंचाई व बांधकाम साहित्यांची दरवाढ; बांधकामांना ब्रेक 

राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : वाळूचे रखडलेले लिलाव त्याबरोबरच बांधकाम साहित्यात झालेल्या भरमसाठ दरवाढीमुळे बांधकाम व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून, अनेकांचे घर बांधकामाचे स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे, तर चालू बांधकामेही बंद ठेवण्याची वेळ बांधकाम करणाऱ्यांवर आली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून बांधकामासाठी लागणाऱ्या सर्वच साहित्यामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. वाळूचे दर तर सोन्याच्या दरापेक्षा जास्त असूनही वाळू मिळणे दुर्लभ झाले आहे. त्यातच सिमेंट, लोखंडी सळ्या यांचे दरही गगनाला भिडल्याने सध्या "घर पाहावे बांधून' याचा प्रत्यय मात्र सध्या घर बांधणाऱ्यांना येऊ लागला आहे. 

काही दिवसांपूर्वी 300 रुपयांना मिळणारे सिमेंटचे पोते सध्या 370 रुपये दराने घ्यावे लागत आहे. सध्याच्या घडीला त्यामागे 70 रुपये एवढी वाढ झाली आहे. तर लोखंडी सळ्या 40 हजार रुपये टन होत्या, त्या आता 58 हजार रुपये टनापर्यंत गेल्या आहेत. यामध्ये जवळजवळ 18 हजार रुपयांची वाढ टनामागे झाली आहे. तर वाळूची उपलब्धताच नसल्याने बांधकामासाठी डस्टचा वापर करावा लागत आहे, त्याचे दरही वाढतच चालले आहेत. त्यामुळे घर बांधणी करतानाचे आर्थिक गणित बिघडून गेले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली बहुतांश बांधकामेही महागाईमुळे बंद पडली आहेत. वाढणाऱ्या खर्चामुळे घर बांधकाम व्यावसायिकांनाही फटका बसला आहे. त्यांना नवीन कामे मिळणेही बंद झाले आहे. 

वाळू टंचाईमुळे घरकुलासह इतर शासकीय बांधकामेही ठप्प झाली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू लिलाव करून चालू करावेत, अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे. 

बांधकाम साहित्यात वरचेवर वाढणाऱ्या दरांमुळे मोठ्या प्रमाणावर बांधकाम करणे अवघड झाले आहे. नवीन बांधकाम मिळत नाही. त्यातच चालू असणारीही बांधकामेही वाढती महागाई व पैशाअभावी बंद पडली आहेत. 
- संजय फडतरे, 
बांधकाम कॉन्ट्रॅक्‍टर, पोमलवाडी 

ग्राहक बांधकाम करण्याच्या साहित्याच्या दुकानाकडे फिरकतच नसल्याने भांडवलाची उलाढाल पूर्णपणे बंद झाली आहे. प्रचंड दरवाढीमुळे बांधकामे थांबली आहेत. त्यातच वाळू टंचाईचे मोठे संकट आहे. 
- राजेंद्र खाटमोडे, 
बांधकाम साहित्य विक्रेते, केत्तूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Negative Energy Remedies: आजपासून चातुर्मास सुरू, रात्री करा 'हे' चमत्कारिक उपाय, नकारात्मकता राहील दूर

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

SCROLL FOR NEXT