Property Card 
सोलापूर

"हद्दवाढ'च्या प्रॉपर्टी कार्डला निधीचा अडथळा ! मोजणीसाठी पैसे देऊ शकता का? "नगरविकास'चे महापालिकेस पत्र 

तात्या लांडगे

सोलापूर : हद्दवाढ शहरात समाविष्ट होऊन 29 वर्षांचा काळ लोटला, तरीही जागा मालकीची असतानाही संबंधितांना महापालिकेकडून प्रापॅर्टी कार्ड मिळू शकलेले नाही. त्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आता या जागांची मोजणी होणार आहे. तत्पूर्वी, मोजणीचे पैसे द्यायचे कोणी, हा पेच निर्माण झाला असून त्यासंबंधी नगरविकास विभागाने महापालिकेस विचारणा केली आहे. 

शहरातील हद्दवाढ भागाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. तेथील तब्बल 60 हजारांहून अधिक मिळकतींची अजूनही मोजणीच झालेली नाही. त्यामुळे दररोज वादाचे प्रसंग उद्‌भवत असून मालकत्ताधारकांकडे प्रापॅर्टी कार्डच नसल्याने त्यांना हक्‍काच्या जागेवर बॅंकेकडून कर्जही काढता येत नाही. याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महापालिकेस मोजणीसंदर्भात पत्रव्यवहार केला. महापालिकेने शहर व हद्दवाढ भागातील प्राथमिक ले-आउट घेतलेल्या अथवा बांधकाम केलेल्यांच्या मिळकतीच्या मोजणीसंदर्भात यापूर्वीच भूमिअभिलेख कार्यालयास पत्र पाठविले आहे. मात्र, हद्दवाढ भागातील नागरिकांच्या मागणीनुसार त्यांच्या मिळकतींची मोजणी करण्यासाठी पैसा द्यायचा कोणी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यासाठी मोजणीचा खर्च संबंधित मिळकतदारांकडून वसूल करण्यासंदर्भात चर्चाही झाली. मात्र, मिळकतदारांनी पैसे न दिल्यास ती रक्‍कम महापालिकेस भरावी लागणार आहे. त्यामुळे नगरसविकास विभागाच्या पत्रावर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. 

मोजणी अन्‌ प्रॉपर्टी कार्डचे फायदे... 

  • जागा मोजणीनंतर मिळकदारांना मिळतो त्याच्या मालकीचा कागद 
  • अंतिम मोजणीनंतर महापालिकेकडून क्षेत्र-जागा नावे होऊन खुणा निश्‍चित होतात 
  • मोजणीनंतर जागा मिळते ताब्यात; महालिका संबंधितांना देते मिळकत 
  • उतारा नावे झाल्यानंतर महापालिका संबंधितांना देते प्रॉपर्टी कार्ड 
  • प्रापॅर्टी कार्डवरून मालमत्ताधारकांना बॅंकेकडून मिळते मूल्यांकनानुसार कर्ज 
  • जागा मोजणीनंतर हद्द निश्‍चित होऊन आपापसातील वादावादी कायमची थांबते 

आयुक्‍त पी. शिवशंकर हे अंतिम निर्णय घेतील 
हद्दवाढ भागातील मोजणी न झालेल्या मिळकतींची मोजणी करण्यास महापालिका पैसे भरु शकते का, असे पत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. त्यासंबंधी आयुक्‍त पी. शिवशंकर हे अंतिम निर्णय घेतील. 
- लक्ष्मण चलवादी, 
सहाय्यक संचालक, नगररचना, सोलापूर महापालिका 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT