Bidi Making 
सोलापूर

आता संभाजी नव्हे, तर साबळे विडी ! संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपामुळे उत्पादकांनी घेतला निर्णय

प्रकाश सनपूरकर

सोलापूर : पूर्वीच्या संभाजी विडीचे नामांतर आता साबळे विडी या नावाने झाले आहे. साबळे विडी या नावाने आता या विडीचे उत्पादन सुरू झाल्याची माहिती साबळे वाघिरे आणि कंपनी प्रा. लि. चे सरव्यवस्थापक बाळासाहेब जगदाळे यांनी दिली आहे. 

साबळे-वाघिरे आणि कंपनी प्रा. लि. च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत श्री. जगदाळे यांनी ही माहिती दिली. 

श्री. जगदाळे पुढे म्हणाले, की हा विडी उद्योग 1932 पासून कार्यरत आहे. सोलापुरात या विडीचे उत्पादन 1965 मध्ये सुरू झाले. या कंपनीत 75 हजार कामगार व कर्मचारी कार्यरत आहेत. या विडीचे उत्पादन महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात देखील घेतले जात आहे. मध्यंतरीच्या काळात संभाजी ब्रिगेड व काही संघटनांनी आक्षेप घेऊन संभाजी विडीचे नाव बदलण्याची मागणी केली होती. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राप्रमाणे आमचेही दैवत आहेत. त्यामुळे उत्पादनाचे नाव बदलण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात उत्पादनाचे नाव बदलणे ही प्रक्रिया कायदेशीर व व्यावसायिकदृष्ट्या फार अवघड होते. तरी ही प्रक्रिया कंपनीने पार पाडली आहे. 

1 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी 
वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या विडी उद्योगावर अवलंबून असलेल्या हजारो महिला विडी कामगारांच्या रोजीरोटीवर याचा काय परिणाम होईल, असा प्रश्‍न समोर होता. तेव्हा नाव बदलण्याच्या संदर्भात संचालक मंडळाने सातत्याने मार्ग काढण्याचे काम चालवले होते. तेव्हा संचालक मंडळाने सप्टेंबरमध्ये नाव बदलण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार कंपनीचे नाव साबळे वाघिरे असे असल्याने याच नावानुसार साबळे विडी असे नाव देण्याचे ठरले. येत्या 1 फेब्रुवारीपासून साबळे विडी नावाने या उत्पादनाची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे श्री. जगदाळे यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT