Dhale Pimpalgaon
Dhale Pimpalgaon 
सोलापूर

विक्रमी पावसाने "ढाळे पिंपळगाव' ओव्हर फ्लो; "हिंगणी, जवळगाव'च्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ

शांतिलाल काशीद

मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील ढाळे पिंपळगाव धरण क्षेत्रात शुक्रवारी (ता. 18) रात्री साडेबारा वाजता सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे ढाळे पिंपळगाव प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. पडलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तसेच हिंगणी, जवळगाव मध्यम प्रकल्पाच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. 

शुक्रवारी मध्यरात्री चार तास झालेला मुसळधार पाऊस यंदाच्या मोसमातील विक्रमी ठरला आहे. आकाशात दिसणारे कोरडे काळेकुट्ट ढग पाहून शेतकरी पुरता हैराण झाला होता. शुक्रवारी रात्री वरुणराजाची कृपा झाली आणि तो धो-धो बरसला. आठ दिवसांपूर्वी मायनसमध्ये असलेला प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने शेतकऱ्यांचा वर्षभरातील पाणी प्रश्न मिटला आहे. ढाळे पिंपळगाव, मळेगाव, बावी, तांदूळवाडी, साकत, पानगाव, कळंबवाडी, पिंपरी, काळेगाव, घाणेगाव, चिखर्डे येथील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

धरण क्षेत्र परिसरातील हजारो एकर द्राक्षबागा, ऊसशेती, सीताफळ, लिंबोणी तसेच इतर बागायती व जिरायती पिकांना यामुळे मोठा फायदा होणार आहे. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पाणी फाउंडेशन, जलयुक्त शिवारमध्ये तयार करण्यात आलेले बंधारे, सीसीटी, एलबेस, शेततळी पूर्णपणे भरली आहेत. प्रकल्पाच्या सांडव्यावरून व पुलावरून ओसंडणारे पाणी पाहण्यासाठी लोकांनी धरणाकडे धाव घेतली आहे. 

शेतकरी संतोष ढाळे म्हणाले, ढाळे पिंपळगाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे परिसरातील हजारो एकर बागायती क्षेत्र जिवंत राहणार आहे. द्राक्षबागा, ऊसशेती व इतर बागायती शेतीला मोठा फायदा होणार आहे. शुक्रवारी मध्यरात्री झालेला पाऊस मोसमातील ऐतिहासिक पाऊस ठरला आहे. प्रकल्प भरण्याची आशा सोडून दिली असताना अचानक पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने कोलकाताला दिला दुसरा धक्का; नारायणपाठोपाठ अर्धशतक करणारा सॉल्टही परतला माघारी

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT