Machnur Yatra.
Machnur Yatra. 
सोलापूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक माचणूरची महाशिवरात्री यात्रा रद्द ! 

दावल इनामदार

ब्रह्मपुरी (सोलापूर) : महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माचणूर (ता. मंगळवेढा) येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेत भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. महाशिवरात्रीपासून सुरू होत असलेल्या या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम, कुस्ती स्पर्धेचे नेटके आयोजन केले जाते. परंतु, या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने या वर्षी महाशिवरात्री यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती यात्रा समितीने दिली. 

मंगळवेढा तालुक्‍यातील माचणूर येथील भीमा नदीच्या पात्रालगत प्राचीन असे हेमाडपंती श्री सिद्धेश्वराचे मंदिर आहे. आजूबाजूच्या परिसरातील निसर्गरम्य देखणे स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री सिद्धेश्वरची यात्रा महाशिवरात्रीच्या दिवशी भरत असून, लाखो भाविकांची दर्शनासाठी रीघ लागत असते. परंतु, या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासन स्तरावरून यात्रा, उरूस आदी उत्सवांना बंदी घालण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर होणारी 11 ते 15 मार्चदरम्यान माचणूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानची यात्रा रद्द करण्यात आली आहे. 

याबाबत प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्नील रावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांची यात्रा कमिटीच्या सदस्यांसोबत बैठक झाली. त्या वेळी माचणूर येथील महाशिवरात्री यात्रा रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच यात्रा कमिटी तर्फे हे निवेदन देण्यात आले. तरी या यात्रा कालावधीत कोणीही नागरिकांनी देवस्थान ठिकाणी जाणार नाही तसेच जिल्ह्यातील व परराज्यातील भाविकांनी याची नोंद घेऊन यात्रेसाठी येऊ नये व दक्षता घ्यावी. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT