Marriage Esakal
सोलापूर

माजी मंत्र्यांनी नातेवाइकाचा विवाह ढकलला पुढे ! सोलापुरात एप्रिलमध्ये एकही विवाह नाही

कोरोनामुळे सोलापुरात एप्रिल महिन्यात एकही विवाह सोहळा नाही

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विवाहावरील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. विवाह समारंभासाठी आता 50 नव्हे तर 25 जणांचीच उपस्थिती असणे बंधनकारक आहे. वधू-वरांकडील मंडळीनीदेखील कोरोनाची धास्ती घेत विवाह समारंभ पुढे ढकलले असून 1 ते 18 एप्रिल या काळात शहरात एकही विवाह झाला नाही.

विवाहासाठी जेवढ्या लोकांची उपस्थिती बंधनकारक आहे, तेवढ्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभ न घेणाऱ्या मंगल कार्यालयांवरच पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत पाच मंगल कार्यालये सील केली असून त्यातील तीन कार्यालयांना अजूनही कुलूपच आहे. दरम्यान, ज्या मंगल कार्यालयात विवाह होणार आहे, तेथील सेवा देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. मागील 48 तासांतील टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणे अनिवार्य असल्याचेही पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, वधू-वरांकडील मंडळींनी दोन्हीकडील केवळ 25 लोकच उपस्थित राहतील, याची दक्षता घ्यावी. त्यांची यादी पोलिस आयुक्‍तालयाला देऊन विवाहासाठी परवानगी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोरोना वाढत असल्याने शहरात मागील 18 दिवसांत एकही विवाह झालेला नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

माजी मंत्र्यांनी नातेवाइकाचा विवाह पुढे ढकलला

उस्मानाबादचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या नातेवाइकाचा एप्रिल महिन्यात सोलापुरातील हेरिटेज गार्डन येथे विवाह नियोजित होता. त्यांनी पोलिस आयुक्‍तालयाकडे त्याची परवानगी मागितली. त्या वेळी विवाहासाठी केवळ 25 लोकांनाच परवानगी मिळेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. त्यांनी वेगवेगळ्या हॉलमध्ये काही लोक बसवता येतील का, याची विचारणा केली. मात्र, पोलिसांनी त्याला नकार दिला. कोरोनाची परिस्थिती पाहून त्यांनी नातेवाइकाचा विवाह पुढे ढकलला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

22 एप्रिलला दोन विवाह

शहरातील दोन मंगल कार्यालयांत 22 एप्रिल रोजी विवाह होणार आहेत. त्यासाठी पोलिस आयुक्‍तालयाकडे त्यांनी परवानगी मागितली असून त्यांनी उपस्थित राहणाऱ्या 25 लोकांची यादीदेखील दिली आहे. त्यानुसार त्यांना कोरोनासंबंधीच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे. तर ज्या मंगल कार्यालयात हे विवाह होतील, त्या मंगल कार्यालयात सेवा देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे, असे पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT