सोलापूर

'कोरोना'मुळे यंदाही पूर्व भागातील रथोत्सवांना फाटा

वेणुगोपाल गाडी

भाविकांसाठी मंदिरे बंदच राहणार असल्याने भाविकांना घरीच सण साजरा करावा लागणार आहे.

सोलापूर: कोरोना आपत्तीमुळे सलग दुसऱ्या वर्षीदेखील पूर्व भागातील विविध विणकर समाजांचे रथोत्सव साजरा करण्यास मनाई आहे. भाविकांसाठी मंदिरे बंदच राहणार असल्याने भाविकांना घरीच सण साजरा करावा लागणार आहे.

पूर्व भागात पद्मशाली, कुरुहिनशेट्टी (जाण्ड्रा), (कुरनी), स्वकुळसाठी, नीलकंठ, नीलगार, तोगटवीर, मडिवाळेश्‍वर परिट अशा विविध समाजांचे श्रावण महिन्यात रथोत्सव असतात. यानिमित्ताने सवाद्य मिरवणुका काढण्याची परंपरा आहे. कोरोना आपत्तीमुळे गतवर्षी मंदिरे उघडण्यास मनाई होती. त्यामुळे श्रावण महिन्यात होणारे रथोत्सव साजरा होऊ शकले नाहीत. यंदादेखील शासनाने मंदिरे बंद ठेवण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील रथोत्सवांना फाटा दिला जाणार आहे.

दरम्यान प्रशासनाकडून या समाजांना त्यांच्या मंदिरांमध्ये धार्मिक विधी करण्यास सशर्त परवानगी राहणार आहे. त्यानुसार पुरोहित व मोजके पदाधिकारी यांनाच मंदिरात प्रवेश राहील. सामान्य भक्तांना मंदिरात जाण्यास मनाई राहणार आहे. सामान्य भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अनेक समाजांकडून धार्मिक विधींचे स्थानिक चॅनेलवरून तसेच फेसबुक लाईव्हद्वारे प्रक्षेपण करण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना घरबसल्या देवाचे दर्शन घेता येईल.

पद्मशाली समाज

पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव दरवर्षी नारळी पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा रविवार (ता. 22) ऑगस्ट रोजी पौर्णिमा आली आहे. सिद्धेश्‍वर पेठेतील मार्कंडेय मंदिरातील महारुद्राभिषेक, होमहवन आदी विधींचे चॅनल-फेसबुक लाईव्हद्वारे दर्शनाची सोय करण्यात येणार आहे, अशी माहिती पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे व सरचिटणीस सुरेश फलमारी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctors Protest: महाराष्ट्रात २ लाख डॉक्टरांचा बेमुदत संप; OPD सेवा ठप्प, रुग्णालयांना मोठा फटका, नेमकं कारण काय?

IND vs AUS: भारतात पाऊल ठेवण्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया घेणार मोठी रिस्क! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीबाबत प्रशिक्षकांनीच दिली माहिती

Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये विशेष सुविधा; खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

शिवसेना कुणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदेंना धक्का बसणार? ठाकरेंच्या वकिलांचा तगडा युक्तिवाद

Latest Marathi News Live Update : राजकीय पक्षाचा कोणताही वैध निर्णय हा विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या इच्छेपेक्षाही वरचढ ठरतो - सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT