malegaon  
सोलापूर

मळेगाव परिसरात मुसळधार पाऊस, शेताला आले तळ्याचे स्वरूप

शांतिलाल काशीद

मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्यातील मळेगाव उपळे (दु), जामगाव, हिंगणी, पिंपरी (सा), ढाळे पिंपळगांव, झाडी, बोरगाव परिसरात वादळी वारे व ढगांच्या गडगडाटासह अर्धा तास मुसळधार पाऊस झाल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उपळे (दु) येथे वादळी वाऱ्याच्या तडाख्यात उपळे- झाडी रोडवर वृक्ष उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक बंद झाली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता अचानक आलेल्या पावसामुळे काढणीला आलेला सोयाबीन तसेच ऊस, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 

अचानक आलेल्या पावसाने सर्वदूर पाणी साचून अनेकांच्या शेतास तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एवढे नुकसान होवूनही नियमांकडे बोट दाखवत प्रशासनाकडून पंचनामे व पाहणी करण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे महसूल विभाग व विमा कंपनीने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी व पंचनामे करून झालेली नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. सलग चार ते पाच दिवस पडलेल्या कडक उन्हामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन  काढणीला सुरुवात केली होती.

मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. गेल्या दहा ते बारा दिवसात बार्शी तालुक्यातील मळेगाव, उपळे, गौडगाव, नारी, पानगाव परिसरात अतिवृष्टीसारख आस्मानी व सुलतानी संकट आल्याने अगोदरच शेतकरी हताश झाला आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे आधीच हतबल झालेला शेतकरी सततच्या पडणाऱ्या पावसामुळे मेटाकुटीला आला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.

संपादन- सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT