सोलापूर

`या` महापालिकेतील घरच्या रखवालदारावर होणार फाैजदारी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर :  अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी करून सुमारे दोन कोटींचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातील दोषींवर चौकशीअंती फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त दीपक तावरे यांनी आज दिले. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यांना महापालिकेचे विश्वस्त म्हणून नेमले आहे त्यांनीच हा प्रकार केल्याचा संशय असल्याने घरचाच रखवाला वैरी झाला आज... म्हणण्याची वेळ सोलापूरकरांवर आली आहे. 

विभागीय कार्यालय क्रमांक एकमध्ये झाला प्रकार 
विभागीय कार्यालय क्रमांक एकअंतर्गत प्रभाग चारमध्ये विकास कामे करण्यात आली व त्याचे बिल उचलण्यात आले. मात्र त्यासाठी सार्वजनिक आरोग्य अभियंता आणि विभागीय अधिकाऱ्यांच्या बनाटव सह्या करण्यात आल्याचा प्रकार नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि चेतन नरोटे यांनी गेल्या शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत उघडकीस आणला होता. त्यावर जोरदार चर्चा झाली आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वच सदस्यांनी केली. त्यानुसार महापौर श्रीकांचना यन्नम यांनी याप्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. 

महापौरांच्या आदेशानुसार आयुक्तांची कारवाई 
महापौरांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आयुक्त श्री. तावरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. तत्पुर्वी या प्रकरणाशी संबंधित विभागीय अधिकारी मोहन कांबळे आणि श्री. कामत यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली. एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. आज श्री. चंदनशिवे व श्री. नरोटे यांनी या प्रकरणातील दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आणि संबंधित घटनेतेली काही पुरावे आयुक्तांकडे सादर केले. त्यानुसार या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल होण्याची शक्‍यता आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT