Vitthal_Rukmini 
सोलापूर

माघी यात्रेत विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला 68 लाखांची देणगी !

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर साजरी झालेल्या माघी यात्रेत श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीला 68 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. 

यात्रा काळात पावती व ऑनलाइन दर्शनाच्या माध्यमातून 13 लाख रुपयांची देणगी मिळाली आहे तर हुंडापेटी व परिवार देवतांच्या चरणी 43 लाख रुपयांचे दान जमा झाले आहे. भक्त निवास 8 लाख रुपये जमा झाले आहेत तर इतर 4 लाख अशी 68 लाख रुपयांची देणगी जमा झाली आहे. 

कोरोना महामारीमुळे लॉकडाउन करण्यात आला होता. यादरम्यान आषाढी यात्रा व कार्तिकी यात्राही रद्द करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश बंदी करण्यात आली होती. यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यातच यात्रेच्या दिवशी पंढरपुरात व श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांविना माघी सोहळा साजरा करण्यात आला. तरीही देशभरातील भाविक व वारकऱ्यांनी घरी राहून माघी यात्रा सोहळा साजरा करत पावती आणि ऑनलाइनच्या माध्यमातून 13 लाखांची देणगी जमा केली आहे. तर माघी यात्रा कालावधीत मंदिरातील विविध हुंडी आणि परिवार देवतांच्या दान पेटीत 43 लाख रुपये जमा झाले आहेत. 

गेल्या वर्षी माघी यात्रेत तब्बल 1 कोटी 90 लाख रुपयांची देणगी मिळाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त 68 लाखांची देणगी मिळाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Ganpati Decoration 2026: कागदी कमळ, केळीची पाने अन् कापसाचे ढग; यंदा गणपती सजावटीसाठी ट्राय करा १० भन्नाट अन् सोप्या आयडिया!

Pune Water Supply: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

SCROLL FOR NEXT