during rainy season corn kernels are sold in every corner of Solapur Sakal
सोलापूर

Solapur Rain Update : पावसाळ्यात सोलापूरच्या प्रत्येक चौकातील कानाकोपऱ्यात मक्याच्या कणसांची विक्री जोरात

Solapur Rain News In Marathi | पावसाळा आणि गरमागरम भाजलेले कणीस हे समीकरण अफलातून आहे. थंडगार हवा, रिमझिम पाऊस आणि मस्त कोळशावर भाजलेले मक्याचे कणीस.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पावसाळा आणि गरमागरम भाजलेले कणीस हे समीकरण अफलातून आहे. थंडगार हवा, रिमझिम पाऊस आणि मस्त कोळशावर भाजलेले मक्याचे कणीस. त्यावर मीठ, लिंबू पिळून, मसाला लावल्यानंतर कणीस खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो.

जून महिन्यापासून मक्याच्या कणसांचा हंगाम सुरु झाला असून, पावसाळ्यात चालणाऱ्या या व्यवसायाला खूप मागणी आहे. पावसाळ्यात सोलापूरच्या प्रत्येक चौकातील कानाकोपऱ्यात मक्याचे कणीस विक्रेते दिसत आहेत. तसेच ऑफिसला जात- येता, कॉलेज मुलांची आवडीने मका खाण्यासाठी गर्दी झालेले पाहायला मिळते.

मक्याचे कणीस फक्त चवदारच नाही तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यात भरपूर फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. कणीस खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, हाडे मजबूत होतात, रक्तदाब नियंत्रित राहते, अन ऊर्जा पातळीही टिकून राहते. तसेच, कणीस हे पचायलाही सोपे असते. तसेच सोलापुरात सहज रस्त्यावरील विक्रेत्यांपासून ते सुपर मार्केटपर्यंत सर्वत्र विकले जाते. १५-२० रुपयाला एक बाजारात उपलब्ध आहे.

पावसाळ्यात कणीस जास्त खाल्ले जाते. कणीसांचा ठराविक हंगाम असतो. देशी मका कणसांपेक्षा स्वीट कॉर्न (गोड) कणसांना जास्त मागणी आहे. मकेचे कणीस हे सर्वांना खायला आवडते. दिवसांतून १०० कणसे विकली जातात. या व्यवसायातून दिवसाला खर्च वजा जाता ४००- ५०० रुपये नफा मिळतो.

- अर्चना गायकवाड, व्यापारी, सोलापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT